Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील फवारा चौक येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. खरंतर सोशल मीडियावर अजय कुमार प्रजापति नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, फवारा चौक येथे जवळच अंसारी चिकनच्या दुकानात चपात्यांवर थुंकी लावली जात असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत व्यक्तीने या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या व्हायरल व्हिडिओत शामली पोलिसांनी ट्विट सुद्धा केले आहे. ट्विटनुसार, पोलिसांनी या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जातआहे. पोलिसांनी पुढे असे लिहिले आहे की, व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. खरंतर यापूर्वी मेरठ आणि अन्य जिल्ह्यात चपात्या बनवताना त्यावर थुंकी लावली जात असल्याची प्रकरणे समोर आली होती.(Raghu Dosa Wala Flying Vada Pav: दक्षिण मुंबई मध्ये थक्क करणार्या अंदाजात 'वडापाव' बनवणार्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल Watch Video)
Tweet:
शामली फवारा चौक के नजदीक अंसारी चिकन के साथ चिकन की दुकान पर रोटी में थूक डालकर रोटी सेकता हुआ यह वीडियो वायरल हो रही है तत्काल कार्रवाई करने कि कृपा करें @Uppolice @myogiadityanath @adgzonemeerut pic.twitter.com/BNYqlhTvF8
— अजय कुमार प्रजापति (@uPn7oewu8e4wC5e) April 2, 2021
व्हायरल व्हिडिओत असे दिसून येते की, दोन तरुण चपाती तयार करत आहेत. त्यामधील एक तरुण ती बनवताना खाली वाकतो. त्याला पाहून असे वाटते की, त्यावर तो थुंकी लावून चपाती तयार करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त भाजप नेते विवेक प्रेमी व काही हिंदू संगठनांमधील लोकांनी कोतवली पोलिसांना माहिती देत आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.