जगात अन्न म्हणून अनेक गोष्टी खाल्ल्या जातात, अनेक देशांमध्ये विविध प्राणी खाणे हे लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मात्र चक्क मानवी मांस खाणे (Cannibal) हे धक्कादायक आहे. युक्रेनमधील (Ukraine) खार्किव्ह (Kharkiv) शहरात राहणाऱ्या पिता पुत्राच्या जोडीला एका पोलिसाच्या हत्येबद्दल आणि नंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून खाल्ल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. या दोघांनी पोलिस कर्मचाऱ्याला ठार मारले, नंतर त्याचा गळा कापला आणि त्याचे अवयव बाहेर काढून खाल्ले. इतकेच नाही तर या दोघांनी हे शरीराचे तुकडे बेघर लोकांना खाऊही घातले. डेली मेलच्या वृत्तानुसार, 42 वर्षीय मॅक्सिम कोस्ट्युकॉव्ह (Maxim Kostyukov) आणि त्याचा 21 वर्षीय मुलगा यारोस्लाव कोस्ट्युकॉव्ह (Yaroslav Kostyukov) यांना 45 वर्षांच्या पोलिस अधिकारी झेन्या पेट्रोव्हच्या (Zhenya Petrov) चा खून केल्याप्रकरणी 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही काही महिन्यांपूर्वी दारू पिण्यास एकत्र बसले होते, तेव्हा तिघांमध्ये कशामुळे तरी भांडण झाले. यानंतर यारोस्लावने पेट्रोव्हला मागून पकडले आणि त्याच्या वडिलांनी पेट्रोव्हच्या छातीवर वार करीत त्याला ठार मारले. पोलिसांनी सांगितले की, यारोस्लावने नंतर पेट्रोव्हचे डोके कापले व त्याचे मूत्रपिंड, हृदय, यकृत आणि बरेच अवयव बाहेर काढून शिजवून खाल्ले. हे शिजवलेले मांस फक्त त्यांनीच खाल्ले नाही तर, शेजारी राहणाऱ्या युरा नावाच्या निराधार व्यक्तीलाही खायला दिले. (हेही वाचा: Lockdown: बहिण आणि तिच्या मैत्रिणी मला Ludo खेळू देत नाहीत; 8 वर्षीय मुलाची केरळ पोलिसांकडे तक्रार)
आपल्याला काय खायला दिले जात आहे हे माहित नसल्याचे युराने सांगितले. दोघांनी उर्वरित मांस शेजारच्या अनेक बेघर लोकांना खायला दिले. यारोस्लावने पोलिसांसमोर कबुली दिली की, पेट्रोव्हचे मांस खाल्ल्यानंतर तो आजारीदेखील पडला होता. शेजारी राहणाऱ्या अलेक्झांड्रा ग्राबेनिक (Alexandra Grabeynik) या व्यक्तीने पोलिसाचे डोके वेगळे केलेलं घड पहिले व त्याने पोलिसांना पाचारण केले. प्रोसिक्यूटर ओक्साना कर्नाउख यांनी कोर्टाला सांगितले की, युक्रेनच्या घटनेत एखाद्या मनुष्याला ठार मारणे आणि खाणे यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षेचा उल्लेख नाही, म्हणून या दोघांना फक्त खुनाबद्दल शिक्षा होऊ शकते.