Two Headed Snake: इराकमध्ये सापडला दोन तोंडं एक शेपटी असलेला विचीत्र साप, (Watch Video)
दोन डोक्यांचा साप (Photo Credit: Twitter)

सर्प (Snake) ही शक्ती आणि प्रजननाची देवता असल्याचे अनेक दाखले पुराणात आहेत. परंतु सध्याच्या यंत्रयुगात या सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्यात तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावर असताना इराकच्या (Iraq) सैद सादिकमध्ये (Said Sadiq) एक दुर्मिळ दोन डोक्याचा साप आढळला आहे. जगभरात सापांच्या अनेक जाती आहेत. शिवाय, आजवर अनेक प्रकारचे साप पाहायला देखील मिळाले आहेत. इराकमध्ये आढळलेला साप देखील विचित्र जातीचा आहे. या सापाचे दोन डोके आणि एक शेपूट असून निरुपद्र्र राखाडी पाण्याचा साप (Gray Water Snake) फक्त 8 इंच लांब आहे आणि त्याचे आयुष्य लहान असण्याची अपेक्षा आहे. CBS News ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या विचित्र सापाचा व्हिडिओ पोस्ट केला असून यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात तो व्हायरल होत आहे.

दरम्यान, सर्पमित्रांनी मात्र बहु डोक्यांच्या सापाच्या अस्तित्त्वाची शक्यता फेटाळली आहेत. शिवाय, दोन डोक्यांचा साप असू शकतो मात्र त्याची शक्यता फार विरळ आहे. CBS News द्वारे शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहून यूजर्स देखील थक्क झाले आहेत. दरम्यान, विलक्षण म्हणून या सापाला संबोधण्याची गरज नाही कारण ज्याप्रकारे माणसांमध्ये क्वचित दोन डोक्यांची जुळी मुलं जन्म त्याचप्रमाणे दोन डोक्याचे स्वरूप म्हणून साप देखील सामान्य असतात. वेगवेगळ्या प्रजातींचे साप जगभरात अनेक ठिकाणी आपल्याला आढळतील.

नैसर्गिक परिस्थितीत, दोन-डोक्याचे साप अस्तित्वात नसतात पण संपूर्ण जगात किंवा म्हणा काही ठिकाणी सापांच्या असामान्य प्रजाती आहेत. दोन डोके साप अगदी दुर्मिळ आहेत, मात्र त्याला पकडणे किंवा पाळणे एक खरा मोठा भाग आहे.