दुर्मिळ दुतोंडाचा साप (Two-Headed Snake) अत्यंत दुर्मिळ प्रजातींपैकी गणला जातो. महत्वाचे म्हणजे, या प्रजातीचे साप खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु, अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना (North Carolina) येथील एका महिलेच्या घरात हा साप आढळून आला आहे. आपल्या घरात आढळलेल्या दुर्मिळ दुतोंडी साप पाहून संबंधित महिला हैरान झाली आहे. जीनी विल्सन, असे या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव आहे. आपल्या घरातील टेबलच्याखाली या सापाला रेंगताना पाहून महिलेने लगेच आपल्या परिवाराला बोलावून घेतले. या घटनेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
या व्हिडिओत संबंधित महिलेने परिवाराच्या इतर सदस्यांसह मिळून धाडस करून या सापाला पकडले आहे. सापाला पकडल्यानंतर त्यांनी एका भांड्यात ठेवले आहे. दुर्मिळ दुतोंड असलेल्या सापाचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशी कोणती जागा आहे? जिथे हा साप चांगल्या प्रकारे राहू शकले, असे कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आले आहे. हे देखील वाचा- Crocodile Kills 8-Year-Old Girl in Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथील तलावाच्या किनारी फुलं तोडण्यासाठी गेलेल्या मुलीवर मगरीचा हल्ला
व्हिडिओ-
दोन तोंड असल्यामुळे महिलेने या सापाचे नाव डबल- ट्रबल ठेवले आहे. या सापाला रेस्क्यू केल्यानंतर त्याला एका विज्ञान केंद्राकडे सोपवण्यात आले. जिथे या सापाचे ओळख ब्लॅक रॅट अशी झाली. तसेच व्हिडिओमध्ये दिसणार हा साप चार महिन्यांचा आहे. प्रत्येक एक लाख सापांमध्ये एक- दोन साप दुतोंडी आढळतात.