मुंबईचा लिट्टी-चोखा विक्रेता। Photo Credits: Twitter/ @khaalipeeli

सोशल मीडिया हे केवळ चर्चा आणि वादांचं केंद्र नाही. त्याचा वापर योग्यरित्या केल्या तर अनेकांचे आयुष्य रातोरात बदलण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. मागील वर्षभराच्या काळात सोशलमीडियामध्ये अनेक हद्यस्पर्शी व्हिडिओज, फोटोज आणि संघर्षाच्या कहाण्या तुम्ही पाहिल्या असतील. त्यामध्येच आता एका मुंबईतील लिट्टी-चोखा विक्रेत्याच्या संघर्षाची कहाणी आहे. बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी सह अनेक नेटकर्‍यांनी लिट्टी चोखा विक्रेत्याच्या मदतीसाठी आवाहन केले होते. यामध्ये झोमॅटो कडून आता प्रतिसाद आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांशु द्विवेदी नामक एका ट्वीटर अकाऊंट युजरने मुंबईच्या वर्सोवा बीच जवळ लिट्टी-चोखा विकणार्‍या एका मुलाची कहाणी पोस्ट केली आहे.

प्रियांशू ने केलेल्या ट्वीटनुसार, योगेश नावाची व्यक्ती उत्तम लिट्टी-चोखा बंवतो. त्याची किंमतही अवघी 20 रूपये आहे. पण आता पैशांच्या अभावी तो आपलं दुकान बंद करण्याच्या विचारात आहे. यावेळेस प्रियांशूने ट्वीटर वर झोमॅटोला टॅग़ करून त्याला आपलं दुकान रजिस्टर करण्याबाबत मदत करावी असं आवाहन केले होते. सोबतच झोमॅटोचे दीपिंदर गोयल यांनी लिट्टी-चोखा विकणार्‍याला मदत करण्याचे अअवाहन केले होते.

पहा पोस्ट

झोमॅटो कडून या ट्वीट वर प्रतिसाद आला आहे. त्यांनी योगेशला संभव मदत करण्याचे सांगण्यात आला आहे. दरम्यान अनेकांनी प्रियांशूची देखील मदतीचा हात पुढे करण्याबाबत पाठ थोपटली आहे. अनेकांनी योगेशच्या लिट्टी चोखाची चव चाखण्याची इच्छा देखील प्रकट केली आहे.