सोशल मीडीया आणि नेत्यांची ट्रोलिंगची प्रकरणं हा प्रकार काही नवा नाही. आदिपुरूष (Adipurush) सिनेमाच्या रिलीज नंतर अनेक मिम्स वायरल होत आहेत. यामध्ये एका ट्वीटर अकाऊंट वरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची तुलना एका पात्राशी करणारं ट्वीट समोर आलं आहे. सोशल मीडीयातील हे ट्वीट सध्या चर्चेमध्ये आहे. ठाणे पोलिसांनी देखील या ट्वीटची दखल घेतली आहे. पोलिसांनी त्या ट्वीट वर रिप्लाय करत युजर कडे त्यांचा मोबाईल नंबर डीएम करण्यास सांगितलं होतं.
दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' हा बहुप्रतिक्षित सिनेमा होता. परंतू अनेक प्रेक्षकांना व्हीएसएक्स आणि रामायणाचा मॉडर्न अंदाज न रूचल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. ही नाराजी सोशल मीडीयावरही पसरली आहे. नक्की वाचा: PIL Against Adipurush: आदिपुरुष चित्रपटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, हिंदू संस्कृती, रामायण आणि प्रभू रामचंद्रांची खिल्ली उडवल्याचा आरोप .
पहा ट्वीट
Please share your contact no via DM.
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) June 16, 2023
16 जूनला रीलीज झालेल्या या सिनेमामध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास आहे. क्रिती सेनन सीतामाई ची भूमिका करत आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. मात्र प्रेक्षकांनी या सिनेमातील काही डायलॉग्सच्या बाबतीत वापरण्यात आलेल्या भाषेवरही आक्षेप नोंदवला आहे.