TikTok Star Siya Kakkar Dies by Suicide: टिकटॉक स्टार सिया कक्कड हिची आत्महत्या; 16 व्या वर्षीच संपवले जीवन, पहा तिचे Video
Siya Kakkar Suicide (Photo Credits: Instagram)

टिकटॉक (TikTok Star Siya Kakkar) स्टार सिया कक्कड हिने वयाच्या 16 व्या वर्षी आत्महत्या (Suicide) करून आपले जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. सियाने हे पाऊल का उचलले याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. इंस्टाग्राम सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhaiyani तर्फे एका पोस्ट च्या माध्यमातून या बातमीची पुष्टी करण्यात आली आहे. सिया ही टिकटॉक वर बरीच चर्चेत होती. इंस्टाग्राम वर सुद्धा तिचे एकूण 93,400 फॉलोअर्स असून टिकटॉक वर तर 11 लाख जण तिला फॉलो करतात. ती टिकटॉक सोबतच इंस्टाग्राम वर सुद्धा आपले डान्स आणि गाणी गातानाचे व्हिडीओज अपलोड करत होती. तिच्या व्हिडीओजना जवळपास 17.5 मिलियन लाईक्स आहेत. सियाच्या निधनाची माहिती मिळताच तिच्या फॅन्सनी तिला श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे. Mia Khalifa Death Hoax: मिया खलिफा ने तिच्या मृत्यूच्या खोट्या बातमीचा 'असा' घेतला समाचार; नेटकर्‍यांनी देखील दिल्या मजेशीर प्रतिक्रिया!

साधारणतः असे पाउल उचलण्यामागे मानसिक तणाव हे मुख्य कारण म्हणुन समोर येते. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्ये नंतर तर हा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आहे. मात्र सियाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार ती कोणत्याही तणावात नव्हती.किंंबहुना काल रात्रीच तिच्याशी बोलणे झाले असताना ती चांगल्या मूड मध्ये होती असेच वाटत होते. सियाने काल म्हणजेच बुधवारी रात्री आपला शेवटचा टिकटॉक अपलोड केला होता. ज्यानंतर आज सकाळी तिच्या निधनाची माहिती समोर आली.

Viral Bhaiyani Post

सिया कक्कड टिकटॉक व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on

 

View this post on Instagram

 

Mehbooba☺️😍🔥

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on

 

View this post on Instagram

 

Just like that :) 🥀

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on

दरम्यान, सियाने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास सुरु आहे. मात्र सध्या तरी यातील कोणतीच माहिती पोलिसांनी दिलेली नाही. मागील काही काळात आत्महत्या हा एक भीषण विषय ठरला आहे. या घटनांमधील कारण अस्पष्ट असल्याने इतके मोठे पाऊल उचलण्यासाठी नक्की काय त्यांना प्रवृत्त करत असेल हा मुख प्रश्न आहे.