TikTok Star Megha Thakur Dies: टिकटॉक आणि सोशल मीडिया स्टार मेघा ठाकूर हिचा वयाच्या 21 वर्षी मृत्यू
Megha Thakur | Jubin Nautiyal (Photo Credit - instagram)

प्रसिद्ध इंडो-कॅनडियन टिकटोक स्टार मेघा ठाकूर (Megha Thakur Died) हिचे गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये (Canada) अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिचे चाहते आणि जगाला दिली. ती एक सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर होती. मेघा ठाकूरने कॅनडातील मेफिल्ड सेकंडरी स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर 2019 मध्ये टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ती तिच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये 60,000 व्ह्यूज आणि 3,000 लाईक्ससह ब्रेकआउट स्टार बनली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते होते. खास करुन ती शारीरिक तंदुस्ती, प्रेरणा आणि फॅशन अशा विषयांवर व्हिडिओ प्रसिद्ध करत होते. तिच्या सौदर्य आणि विशेष तंदुस्तीचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करत असत. तिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीयांसाह तिच्या चाहत्यानाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रेरणादायी व्हिडिओ कंटेंट यांसाठी ती सोशल मीडियावर लोकप्रिय होती. मूळची मध्य प्रदेशातील इंदूर येथील असलेली मेघा ठाकूर कॅनडातील ओंटारियो येथील ब्रॅम्प्टन येथे राहात होती. ट्विटरवर तिचे 93,000 फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 102,000 फॉलोअर्स होते. 2001 मध्ये जन्मलेल्या मेघा ठाकूर हिने सोशल मीडियावर स्वत:च्या प्रभावाने खास असा चाहता वर्ग निर्माण केला होता. पाठिमागच्या आठवड्यात कॅनडामध्ये 24 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले. (हेही वाचा, बोल्ड मॉडेल Nikita Gokhale चा प्रवास ऐका Spotify वर; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती)

इन्टापोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha (@meghaminnd)

मेघाच्या पालकांनी तिच्या मृत्यूबद्दल तिच्या घोषणा करताना फॉलोअर्सना उद्देशून इंस्टाग्रामवर लिहिले- आम्ही अतिशय जड अंतःकरणाने आमच्या जीवनातील वेदनेची घोषणा करतो आहोत. आमची अत्यंत प्रिय आणि आमची काळजी घेणारी आमची सुंदर मुलगी मेघा ठाकूर हिचे 24 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले. पाठिमागच्या आठवड्यात पहाटेच्या वेळी ती आम्हास आणि आपणा सगळ्यास सोडून गेली.

दरम्यान, मेघा ठाकूर हिचे इतक्या लहान वयात अचानक निधन झाल्याचे नेमके कारण काय याचा तपशील तिच्या पालकांनी जाहीर केला नाही. मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी तिच्या स्मरणार्थ एक अंत्यसंस्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. तिच्या मृत्यूच्या सुमारे 4 महिन्यांपूर्वी तिच्या एका व्हिडिओमध्ये, ठाकूर हिने सांगितले होते की ती चिंताग्रस्त होती. तिला मानसिक ताणही येत होता. दरम्यान या व्हिडिओत ती नेमकी कोणत्या घटनेबद्दल बोलत होती याची पुष्टी होऊ शकली नाही.