Fact Check: यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांना सरकारी नोकरीत मान्यता नाही? पीआयबीने दिली 'अशी' माहिती
Representational Image (Photo Credits: PTI)

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक बातम्यांचा प्रसार केला जातो. मात्र, यापैकी काही बातम्या खऱ्या तर, काही तथ्थहीन असतात. ज्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. यातच इयत्ता दहावी (10 th), बारावी (12th) उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात असे सांगितले जात आहे की, यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांना सरकारी नोकरीत मान्यता दिली जाणार नाही. दरम्यान, भारत सरकारच्या संस्थेच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या बातमीमागचे सत्य शोधून काढले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळाले. कोरोना संकटामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा ऑनलाईन पार पडल्या आहेत. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जुन्या रेकॉर्डच्या आधारे पुढील वर्गात बढती देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सांगितले जात आहे की, यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण सरकारी नोकरीत मान्य नाही. हे देखील वाचा- Fact Check: कोरोना विषाणू विरोधी लस म्हणून तरुणांना दिले जाणार Anti-Fertility डोसेस? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

पीआयबीचे ट्वीट-

या बातमीचा खुलासा करताना पीआयबीने म्हटले आहे की, व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. केंद्र सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कृपया अशाप्रकारच्या कोणत्याही बातम्या आणि फोटो शेअर करु नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.