Oldest Living Dog in World: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (GWR) जगातील सर्वात वृद्ध जिवंत कुत्र्याचा (Oldest Living Dog) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या कुत्र्याने सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम केला आहे. GWR च्या अधिकृत वेबसाइटनुसार, TobyKeith फ्लोरिडा येथील चिहुआहुआ जातीचा (Chihuahua Bread) 21 वर्षे आणि 66 दिवसांचा कुत्रा जगातील सर्वात वयस्कर जिवंत कुत्रा ठरला आहे. या कुत्र्याची मालकीण गिसेला शोर (Gisela Shore) ही अमेरिकेतील ग्रीनक्रेस, फ्लोरिडा येथील रहिवासी आहे. गिसेलाने सांगितले की, टोबीकिथ हा खूप गोंडस कुत्रा आहे.
जगातील सर्वात वयस्कर जिवंत कुत्रा -
पोस्ट शेअर करताना GWR ने लिहिले, 'सर्वात जुना जिवंत कुत्रा टोबीकीथ - 21 वर्षे 66 दिवसांचा.' GWR नुसार, गिसेला शोरने कुत्रा काही महिन्यांचा असताना प्राणी केंद्रातून दत्तक घेतला. तेव्हापासून टोबीकीथ तिच्यासोबत आहे. (हेही वाचा - Lemon Viral Photo: लग्न समारंभात वराला भेट म्हणून दिले लिंबू; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो)
तिने सांगितले की, ती पेगी अॅडम्स अॅनिमल रेस्क्यूमध्ये स्वयंसेवा करत होती. तेव्हा एका कर्मचार्याने तिला सांगितलं की, एका वृद्ध जोडप्याला कुत्र्याचे पिल्लू द्यायचे आहे. याच कारण विचारल्यावर या जोडप्याने सांगितलं की, ते यापुढे कुत्र्याची काळजी घेऊ शकत नाहीत.
यानंतर गिसेला शोर यांनी जाऊन वृद्ध जोडप्याची भेट घेतली. तिची ओळख लहान चिहुआहुआशी झाली. ज्याचे नाव सुरुवातीला पीनट बटर होते. नंतर त्याने कुत्र्याचे नाव बदलून टोबीकीथ ठेवले. चिहुआहुआ जातीच्या कुत्र्याची सरासरी आयुर्मान 12 ते 18 वर्षे असते.
View this post on Instagram
दरम्यान, जेव्हा टोबीकीथ 20 वर्षांचा झाला, तेव्हा गिसेलाला आश्चर्य वाटले की, तो जगणारा सर्वात जुना कुत्रा आहे का? GWR ने अधिकृतपणे रेकॉर्डची पुष्टी केली. यानंतर गिसेलाने हा आनंद व्यक्त करत टोबीकीथला आंघोळ घातली. त्याचे नखे कापली आणि त्याला लांब कारमध्ये फिरायला घेऊन गेले.