Viral Video: सध्या थंडी झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे, तर युरोप आणि अलास्कामध्ये बर्फवृष्टीमुळे वाईट परिस्थिती आहे. दरम्यान, युरोपातील काही देशांतील अनेक भागात तलाव आणि नद्यांचे पाणी घनरूप झाले आहे. यादरम्यान लोक त्यांच्यावर मस्ती करताना दिसत आहेत.सध्या बर्फाचा आनंद लुटण्यात माणसांसह प्राणीही मागे नाहीत. नद्या आणि तलावांवरील बर्फावर प्राणी देखील मजा करताना दिसले आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी बर्फाचा थर कमकुवत झाल्यामुळे माणसं आणि प्राणी बर्फात पडताना दिसत आहेत. जे खूप धोकादायक आहे. बर्फाळ पाण्यात पडल्याने शरीर गोठण्याबरोबरचं हायपोथर्मियाचाही धोका असतो. ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. (वाचा - Viral Video: वडीलांबाबत प्रेम व्यक्त करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा बर्फाने गोठलेल्या नदीच्या कमकुवत भागात पडताना दिसला आहे. हा प्रकार घडल्याने कुत्र्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने कुत्र्याकडे मदतीचा हात पुढे केला. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती नदीतील बर्फ तोडून पुढे जाताना दिसत आहे.
View this post on Instagram
गोठलेल्या कॅल्मियस नदीत किनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर एक कुत्रा पाण्यात अडकला होता. एक व्यक्ती नदीतील बर्फ तोडतो आणि कुत्र्यापर्यंत पोहोचतो. कुत्र्याला वाचवून त्याच्यासोबत पुन्हा जमिनीवर आणतो, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ युक्रेन, ईस्टर्न युरोपमधील डोनेस्कचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याला वाचवल्याबद्दल सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचे खूप कौतुक होत आहे.