Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Telangana Shocker: बंद बिअरच्या बाटलीत सापडला मृत सरडा, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

तेलंगणातील विकाराबादमध्ये बिअरच्या बाटलीत सरडा सापडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारली गावातील देशी दारूच्या दुकानातून दोघांनी बिअरची बाटली घेतली होती. त्यांनी बाटली उघडली असता त्यांना आतमध्ये एक मृत सरडा तरंगताना दिसला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

व्हायरल Shreya Varke | Oct 28, 2024 02:27 PM IST
A+
A-
Telangana Shocker

Telangana Shocker: तेलंगणातील विकाराबादमध्ये बिअरच्या बाटलीत सरडा सापडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारली गावातील देशी दारूच्या दुकानातून दोघांनी बिअरची बाटली घेतली होती. त्यांनी बाटली उघडली असता त्यांना आतमध्ये एक मृत सरडा तरंगताना दिसला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याचवेळी पोलिसांनी दारू विक्रेत्याकडे चौकशी केली असता, ही समस्या बहुधा दारूभट्टीत झाली असावी, असे त्याने सांगितले. मात्र, ग्राहकांना अशा अप्रिय प्रसंगांना सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, हैदराबादमधील एका कुटुंबाला त्यांनी झोमॅटोवरून मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये एक मृत सरडा सापडला होता.

बिअरच्या बंद  बाटलीत मृत सरडा

ही बाब डिसेंबर २०२३ ची आहे. जेव्हा एका कुटुंबाने  बावर्ची बिर्याणीची बिर्याणी ऑर्डर केली. परंतु, त्यांनी पार्सल उघडले असता तांदळात मृत सरडा असल्याचे त्यांना आढळले. या घटनेचा निषेध करत कुटुंबीयांनी बावर्ची बिर्याणी बाहेर निदर्शनेही केली होती. या सर्व घटनांमुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. आपले अन्न आणि पेये किती सुरक्षित आहेत याची ग्राहकांना चिंता असते. सध्या, अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करत आहेत.


Show Full Article Share Now