साप म्हटलं की, बाप रे! असा शब्द नकळत आपल्या तोंडातून बाहेर पडतो. कोठेही साप पाहिला की, आपल्या अंगाचा थरकाप सुटतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 7 फूट लांब कोब्रा (Cobra) मुलींच्या वसतीगृहामधील बाथरूममध्ये घुसलेला पाहायला मिळत आहे. मुलींनी कोबरा पाहताचं आरडाओरड सुरू केली. त्यामुळे साप बाहेर पडण्यास धडपडू लागला. मुलींच्या आरडाओरड्यामुळे साप पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता. बेसीन तसेच आरशावर चढून तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. परंतु, फर्शीमुळे त्याला भिंतीवर चढता येत नव्हतं.
हा व्हायरल व्हिडिओ तमिळनाडुमधील भारथिअर युनिवर्सिटीच्या (Bharathiar University) मुलींच्या वसतीगृहातील असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. (हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! दारु पिऊन तरुणाने केला सापासोबत नागीण डान्स; पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ)
#WATCH Tamil Nadu: A cobra entered into girls’ hostel of Bharathiar University campus in Coimbatore, earlier today. pic.twitter.com/qGRFy6lsOY
— ANI (@ANI) January 18, 2020
या वसतीगृहात 2019 मध्ये सापाने दंश केल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाला होता. या अगोदर वसतीगृह परिसरामध्ये अनेकदा सापाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारथिअर युनिवर्सिटी प्रशासनाने यासंदर्भात लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा विपरित घटना घडण्याची शक्यता आहे.