जरा कल्पना करा, जर तुम्ही खरेदी करताना सुपरमार्केटच्या एका सेक्शन मध्ये पोहोचलात आणि तुम्हाला दोन डोळे समोर चमकताना दिसत असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असाच प्रकार ऑस्ट्रेलियातील एका महिलेसोबत घडला आहे. तिने सुपरमार्केटमध्ये असे काहीतरी पाहिले, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. ही घटना ऑस्ट्रेलियाची (Ausralia) राजधानी सिडनीची (Sydney) आहे. तिथे वूलवर्थ्स सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेली एक महिला काही मसाले खरेदी करत होती, तेव्हा तिला एका अजगराचा सामना करावा लागला. डायमंड पायथनची प्रजाती पाहून त्या महिलेला धक्काच बसला मात्र ती ज्या ठिकाणी होती तिथली परिस्थिती पाहता तिने जोरात ओरडणे योग्य समजले नाही. (Cobra ला पकडून त्याच्यापासून बचाव कसा कराल याचा लाईव्ह व्हिडिओ करणे तरुणाला पडले महागात, गमावला जीव)
हेलेना अलाती (Helaina Alati) नावाच्या महिलेसोबत हा प्रकार घडला . महिलेच्या म्हणण्यानुसार, घरासाठी काही मसाले घेत असताना तिची नजर पेटींमधून डोकावणाऱ्या डोळ्यांवर पडली. त्यावेळी हा अजगर महिलेपासून 20 सेमी अंतरावर होता. हेलेना म्हणाली की अजगर मसाल्याच्या साठ्याच्या मागे बसला असावा म्हणून कोणीही त्याला पाहू शकले नाही. बाहेर आल्यावर तो हेलिनाच्या समोर आला.
हेलिना स्वतः एक साप पकडणारी होती आणि अजगराबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तिने तिच्या घरातून काही आवश्यक उपकरणे आणून त्याला पकडण्यास मदत केली. हेलेना अलाती यांच्या मते, अजगर बऱ्यापैकी शांत होता आणि सहज बॅगमध्ये गेला. ती म्हणते की तिने पूर्वी अनेक विचित्र ठिकाणाहून साप काढले आहेत, पण सुपरमार्केटमध्ये अजगर बसला असेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. सुपरमार्केटमधला अजगर विषारी नव्हता, परंतु त्याचा चावा खूप वेदनादायक असू शकतो. डायमंड पायथनची प्रजाती बहुतेकदा झुडपे आणि सिडनीच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये आढळते. ते हळूहळू फिरतात पण सापांच्या तुलनेत त्यांच्यात विष नसते.त्यांचे दात तीक्ष्ण आसतात आणि त्यांनी चावल्यावर खोल जखम होते.