मुंबई: यंदा देशभरातील सर्वात स्वच्छ शहरांचा आढावा घेण्यासाठी 4 ते 31 जानेवारी दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2020 (Swachh Survekshan 2020) चे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन वोटिंग द्वारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे आता अखेरचे काही तास शिल्लक असताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनोख्या मार्गाने आपल्या शहरवासीयांनी मत देण्यासाठी आवाहन केले आहे. सुपर मारियो (Super Mario) या जगप्रसिद्ध खेळाची झलक दाखवत पालिकेने एक छोटासा व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. यात तुमच्या शहराला स्वच्छ शहराचा अवॉर्ड मिळवून देण्यासाठी अवघ्या दोन स्टेप्स फॉलो करा त्यातील एक म्हणजे कचऱ्याचे विभाजन आणि सर्वेक्षणात मतदान असे सांगण्यात आले आहे. मारियो या खेळाची लोकप्रियता पाहता हा व्हिडीओ आणि ही क्रिएटिव्ह ट्रीक सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 हा उपक्रम हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री कडून राबवण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व शहरांचा आढावा घेण्यात येणार आहे, यंदाचे या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. अलीकडेच मुंबईत अंतर्गत रित्या हा सर्वात स्वच्छ वार्डचा अवार्ड जी- वार्ड म्हणजेच वरळी परिसराला देण्यात आला आहे. या परिसरात कचरा उचलण्यासाठी ई- सायकल सारख्या अनोख्या कल्पना राबविल्याने स्वच्छतेच्या बाबतीत हा परिसर अग्रेसर ठरला आहे.
पहा BMC चे ट्विट
Don't let Mumbai die on the 8-4! Help 'one up' its level by voting in @SwachhSurvekshan at: https://t.co/y5jiCeLYb2@swachhbharat @MySwachhMumbai @SwachhBharatGov#SwachhSurvekshan2020Mumbai#MumbaiVijayiAamhiVijayi pic.twitter.com/lBgl1vIWEt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 28, 2020
दरम्यान, सुपर मारियो ची थीम ही अलीकडेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी देखील अशाच प्रकारे वापरण्यात आली होती. आप कडून अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारासाठी ही थिम वापरून एक व्हिडीओ बनवण्यात आला होता. यात केजरीवाल हे दिल्लीतील समस्यांचे अडथळे पार करत कशा प्रकार विजय मिळवतात हे दाखवण्यात आले होते.