Sudha Murthy Selling Vegetables: आज ट्विटरवर इन्फोसिस फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे (Infosys) सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांच्या नावाचा हँशटॅग ट्रेन्ड होत आहे. सध्या सोशल मीडियावर सुधा मूर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुधा मूर्ती बंगळुरूच्या जयनगरमधील श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे भाजीपाला विकताना (Sudha Murthy Is Selling Vegetables) दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा चार वर्षांपुर्वीचा जुना फोटो आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्चवर हा फोटो 2016 चा असल्याचे दिसत आहे. सुधा मूर्ती यांचा हा फोटो अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. सुधा मूर्ती अहकांराला दूर ठेवण्यासाठी वर्षातून एकदा भाजी विक्रिचं काम करतात. त्यांच्या या कार्याला सोशल मीडियावरील अनेक युजर्संनी सलाम केला आहे. (हेही वाचा -Elephant Calf Names Sudha Murthy: मादी हत्तीचे नाव ठेवले सुधा मूर्ती, बंगळुरु येथील प्राणिसंग्रहालयाचा निर्णय)
I think what Sudha Murthy does is sort out and chops veggies at the Raghavendra Swami Mutt in Jayanagar Bengaluru. But yes it is an act of selflessness and service. Respect. https://t.co/gIYCJnhlJ0
— Smita Prakash (@smitaprakash) September 13, 2020
Every year Sudha Murthy, wife of founder Infosys, spends one year selling vegetables to get rid of Ego.
How one doesn’t let money change their values. pic.twitter.com/9MbkpZcVoc
— Surbhi (@surbhig_) September 12, 2020
सुधा मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या प्रयत्न करत असतात. अनेक तरुणांसाठी त्या एक प्रकारच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून अनेक पुस्तकं लिहिली आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे.