बंगळुरु (Bengaluru) येथील एका प्राणिसंग्रहालयातील एका मादी हत्तीचे नाव सुधा मूर्ती (Elephant Calf Names Sudha Murthy) असे ठेवणयात आले आहे. इन्फोसीस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती यांच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आले आहे. सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन (Wildlife Conservation) आदिंसाठी दिलेले योगदान पाहता त्यांच्या सन्मनार्थ हे नाव ठेवण्याचा निर्णय येथील प्राणिसंग्रहालयाने घेतला आहे.
प्राणिसंग्रहालयाच्या एक अधिकाऱ्याने सांगितले की, एका 45 वर्षीय हत्तीनीने एका मादी जातीच्या हत्तीला जन्म दिला आहे. त्याचे नाव सुधा मूर्ती असे ठेवले आहे. संबंधित प्राणिसंग्रहालयाचे कार्यकारी निदेशक वनश्री विपिन सिंह यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'बंगळुरु बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथे ही घोषणा करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आम्ही इन्फोसीस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती यांच्या सन्मानार्थ एका हत्तीनीचे नाव सुधा मूर्ती असे ठेवत आहोत. हत्तीन सुवर्णा हिने 20 ऑगस्ट रोजी एका पिलाला जन्म दिला. त्याचेच नाव आम्ही सूधा असे ठेवत आहोत.' (हेही वाचा, कौतुकास्पद! बिहार येथील प्राणीप्रेमी अख्तर इमाम यांनी आपल्या दोन हत्तीच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, वाचा सविस्तर)
सन 2016 आणि 2017 मध्ये मूर्ती यांनी या प्राणिसंग्रहालयात झेब्रा, जिराफ आणि वाघांच्या संगोपण आणि बचावासाठी मोठे योगदान दिले. यात कर्मचारी कल्याण निधी, सोयी सुविधा आणि इतर अनेक मोलाच्या मदतीचा समावेश आहे.