Drone द्वारे किडनी डिलिव्हर करण्याचा प्रयोग यशस्वी; 10 मिनिटात पार केले 5 किलोमीटरचे अंतर
Kidney Deliver by Drone (Photo Credits: YouTube)

आतापर्यंत ड्रोनचा वापर हा शूटिंग आणि हेरगिरीसाठी होत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र ड्रोनचा एका आगळावेगळा उपयोग अमेरिकेत करण्यात आला. अमेरिकेत ड्रोनद्वारे किडनी डिलिव्हर करण्यात यश आले आहे. जगात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे किडनी डिलिव्हरीचा प्रयोग करण्यात आला. ड्रोनने 5 किलोमीटरचे अंतर केवळ 10 मिनिटात पार केले. त्यानंतर किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रीयाही यशस्वी झाली. ट्रान्सप्लांटटेशनसाठी शरीराचे अवयव डिलिव्हर करण्यासाठी ड्रोन हा सर्वात गतीशील, सुरक्षित आणि कमी खर्चिक पर्याय असल्याचे ड्रोन डेव्हलपर्सचे म्हणणे आहे.

ट्रान्सप्लांटटेशनसाठी शरीराचे अवयव डिलिव्हर करण्यासाठी विमानाचा वापर करणे सामान्यपणे योग्य आहे. मात्र काही वेळा विमानांना होणारा विलंब, काही ठराविक ठिकाणी न पोहचू शकणे या अडचणी विमानातून अवयव डिलिव्हर करताना येतात. अशावेळी अवयव डिलिव्हर करणे कठीण होते. त्यामुळे अमेरिकेत किडनी डिलिव्हर करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोनमध्ये किडनी एका सील कार्गो डब्ब्यात ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती एचओएमएएल (HOMAAL) मध्ये ठेवण्यात आली होती. (HOMAAL- मानवी अवयवाची सुरक्षितता आणि लांबच्या प्रवासासाठी गुणवत्ता आश्वासक उपकरण) त्यानंतर ट्रोन सातत्याने जीपीएसच्या आधारे ट्रॅक करण्यात येत होतं. ट्रोनची योग्य दिशा तपासण्यासाठी तो ट्रॅक करणे आवश्यक होते.

पहा व्हिडिओ:

डॉक्टर जोसेफ आर. युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहेत. त्यांनी या ड्रोनच्या प्रयोगाची सुत्रं हाती घेत टीमचे नेतृत्व सांभाळले होते. डॉ. जोसेफ म्हणाले की, "एकदा किडनी रुग्णापर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 29 तास लागले होते. त्यानंतर ड्रोनद्वारे ऑर्गन डिलिव्हर करण्याचा विचार डोक्यात आला. ड्रोनचे मेडिकल क्षेत्रातील पर्दापण म्हणजे एक नवे पाऊल आहे."