लग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...
गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा (फोटो सौजन्य-फेसबुक )

व्यक्ती आपला स्वार्थ आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. चांगले काम केले तर शबासकी मिळते नाहीतर वाईट शब्दांत त्या गोष्टीबद्दल कानउघडणी केली जाते. अशाच पद्धतीचा एक प्रकार समोर आला असून काही लोकांनी एक पार्टी थीम ठरवली. त्यानुसार ती थीम सर्वांची फॉलो करण्यासाठी चक्क गाढवाला रंग लावून झेब्राचे रुप देण्यात आले. असे का झाले याबद्दलसुद्धा तुम्ही जरुर जाणून घ्या. तत्पूर्वी या रंग लावलेल्या गाढवांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून नेटकऱ्यांकडून याबद्दल टीका केली जात आहे.

उघडकीस आलेला प्रकार हा स्पॅनिश बीच टाउन येथील आहे. येथे एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. तर लग्नासाठी एक थीम नैसर्गिक पद्धतीची ठेवण्यात आली होती. तसेच महिलेने लग्नाचे वातावरण खरेखुरे दाखवण्यासाठी जनावरे ठेवण्यात आली. मात्र गाढवांना झेब्रा म्हणून लग्नातील मंडळींसमोर सादर करण्यात आले.

(Fish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं?)

एका व्यक्तिला हे खरे झेब्रा नसून गाढव असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच या गाढवांना जाणीवपूर्वक पाहिले असता त्यांना रंग लावून झेब्रा बनवण्यात आले असल्याचे समोर आले. त्यानंतर त्या व्यक्तीने अॅनिमल राईट्स कार्यकर्ते यांच्याकडे या प्रकाराबद्दल तक्रार केली. तसेच व्यक्तीने गाढवांचा अशा पद्धतीने अपमान केल्याने राग व्यक्त केला असून त्यांचा जीवाला अशा माणसांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.