Zero Movie (Photo Credits: Red Chillies Entertainment)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची जादू ओसरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अलिकडेच शाहरुखचा झिरो (Zero) सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात शाहरुख खान (Shahrukh Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif), अनुष्का शर्मा (Anushka Sharma) अशी तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस पडला नाही. याला कारण ठरलं सिनेमाचं कथानक. सिनेमाची कथा प्रेक्षकांना रुचली नाही आणि ती नाराजी सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून व्यक्त झाली. 'झिरो' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कमाई किती?

सोशल मीडियावर झिरो सिनेमाची जबरदस्त खिल्ली उडविण्यात आली. हे मीम्स चांगलेच व्हायरल होत आहेत....

शाहरुखचे लागोपाठ काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु न शकल्याने त्याचे करिअर धोक्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.