Sara Tendulkar and Shubman Gill (Photo Credits: Twitter)

कोलकाता नाईट राईडर्सचा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) यांच्यात काहीतरी शिजतेय, अशा चर्चां गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहेत. यातच सारा तेंडूलकरने आपल्या इंस्टाग्रामवर हर्ट इमोजी टाकत शुभमन गिलचा फिल्डिंग करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सारा आणि गिल यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे. महत्वाचे म्हणजे, शुभमन गिलने गेल्या काही दिवसांपूर्वी नव्याकोऱ्या गाडीसह इनस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर साराने अभिनंदन अशी कमेंट केली होती. साराने केलेल्या या कमेंटमुळेही दोघांतील अफेअरची चर्चा सुरु झाली होती.

केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान सारा तेंडूलकर हिने एक व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली आहे. ज्यात सुर्यकुमार यादव याने मारलेल्या शॉटवर शुभमन गिलने डाईव्ह मारत चेंडू रोखला आहे. साराने शेअर केलेला व्हिडिओ तिच्या सोशल मीयावर अकाऊंटवर नाही, परंतु, तिने शेअर केलेली स्टोरी फॅन्सने सेव्ह केली आहे. महत्वाचे म्हणजे, या स्टोरीमध्ये तिने हर्ट इमोजी लावल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- KKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय

फोटो-

साराने गेल्या काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टला तिने आय- स्पाय अशी कॅप्शन देखील दिली होती. साराने केलेल्या या पोस्टनंतर काही क्षणातच शुभमन गिलने स्वत: फोटो एक टाकून त्या पोस्टला आय- स्पाय हीच कॅप्शन दिली होती. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला होता.