Fake Woman TT Video: उत्तर प्रदेशमध्ये पातालकोट एक्सप्रेस ट्रेनमध्ये बनावट महिला टीटी पकडल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महिलेला झाशी स्थानकावर ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.रेल्वेत टीटी तिकीट तपासणाऱ्या बनावट महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. या व्हिडिओमध्ये मुलीने जॅकेट घातले होते आणि तिच्या गळ्यात एक ओळखपत्रही लटकले होते, त्यामुळे ती खऱ्या टीटीसारखी दिसत होती.हेही वाचा: Mumbai Shocker- TTE Manhandling Passenger: कांदिवली स्थानकामध्ये टीसी कडून विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशासोबत गैरवर्तन (Watch Video)
उत्तर प्रदेश : पातालकोट एक्सप्रेस ट्रेन में फर्जी महिला TT पकड़ी गई। झांसी में RPF ने महिला को कस्टडी में लिया, पूछताछ जारी है।
इतनी गरमी में जैकेट कौन पहनता है भई? नकल के लिए अक्ल चाहिए होती है।
Video : @AnujTyagi8171 pic.twitter.com/VTi7vDyVxj
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 25, 2024
सोशल मीडियावर प्रश्न
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि विचारले की, "एवढ्या उन्हात कोणी जॅकेट घालून कसे चालेल?" आणखी एका युजरने गंमतीने लिहिले की, "फसवणुकीसाठी बुद्धीमत्ता देखील आवश्यक आहे."
महिला कशी पकडली? (आरपीएफने पातालकोट एक्सप्रेस ट्रेनमध्ये बनावट टीटीला अटक)
ट्रेनमध्ये चेकिंग करताना काही प्रवाशांनी तिच्या ओळखीवर प्रश्न उपस्थित केल्याचे लक्षात आल्यानंतर आरपीएफला महिलेवर संशय आला. प्रवाशांच्या तक्रारीनंतर आरपीएफने महिलेला पकडून तिची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान महिलेने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी महिलेविरुद्ध रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.