Tiger In India: सुंदरबन येथील  वाघाचा कारनामा; समुद्र, नद्या-नाल्यांसह 100 किमी आंतर पार करत बांग्लादेशात पोहोचला
Tiger | (Photo Credit: Twitter/@ParveenKaswan)

वन्य प्राणी, जंगल सफरींचा आनंद घेणाऱ्या आणि नोंदी ठेवणाऱ्या आनेकांना एका वाघाने थक्क केले आहे हा वाघ भारतातून चार महिन्यांत तब्बल 100 किलोमीटर अंतर पार करत थेट बांग्लादेशात जाऊन पोहोचला आहे. ऊन, वारा, पाऊस, नद्या, नाले आणि नैतरही नैसर्गिक संकट आणि अडचणींचा सामना करुन वाघाने पार केलेले हे आंतर अनेकांसाठी आश्चर्य ठरत आहे. हा वाघ भारतातील सुंदरबन (Sunderbans of India) येथील आहे. सुंदरबनमधील रेडिओ कॉलर असलेलेला हा वाघ (Radio-Collared Tiger) देशाच्या सीमा पार करुन शेजारील राष्ट्रात पोहोचला आहे. पश्चिम बंगालचे मुख्य वन्यजीव वॉर्डन व्ही के यादव यांनी हिंदुस्तान टाईम्सचा हवाला देत म्हटले की, अनेक आव्हानांचा सामना करत हा वाघ बांग्लादेशात पोहोचला.

नर प्रजातीतील हा वाघ डिसेंबर 2020 मध्ये रेडिओ कॉलर करण्यात आला होता. जेणेकरुन त्याच्या हालचालींवर पाळत ठेवणे आणि तो नागरीव वस्तीच्या संपर्कात आल्यास त्याची माहिती मिळणे सोपे जावे. यादव यांनी म्हटले की, बांग्लादेशच्या आपल्या चार महिन्यांच्या यात्रेदरम्यान वाघ कोणत्याही प्रकारे नागरी वस्तीत आला नाही.

यादव यांनी म्हटले की, वाघाने सुंदरबन येथील तलपट्टी द्वीपमधून हरियाली, छोटो, बोरो हरिखली आणि त्यासोबतच रायमंगल यांसारख्या नद्याही पार केल्या आणि तो भारताच्या सीमेबाहेर पडला. त्यांनी म्हटले की, हा वाघ भारतातच मुळात बांग्लादेशातून आलेला असावा. त्यानंतर त्याला वन अधिकाऱ्यांनी पकडले असावे आणि टॅगिंग केले असावे. (हेही वाचा, लज्जास्पद! केवळ नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, यवतमाळमधील क्रूर घटना)

ट्विट

भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी पाठिमागील सात वाघांबाबत रेडिओ कॉलिंग संदर्भात माहिती दिली. त्यांनी आज सकाळी बडी बिल्लीवर एक माहिती सामायिक केली. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, हा वाघा तब्बल 100 किलोमिटरचे आंतर पार करुन भारतातून बांग्लादेशमध्ये पोहोचला. ज्यामध्ये खाडी आणि संमुद्राचाही समावेश आहे.