भुकंपामुळे इमारतीच्या 53 व्या मजल्यावरुन स्विमिंग पूलचे पाणी धबधब्यासारखे वाहू लागले (Watch Video)
Rooftop Swimming Pool Pour Down (Photo Credits: Youtube)

भूकंप ही नैसर्गिक आपत्ती सर्वांनाच हादरुन सोडणारी आहे. फिलिपिन्सच्या (Philippines) पूर्व समर प्रांतात मंगळवारी (23 एप्रिल) रिक्टर 6.5 च्या तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. या भुकंपात एक कॉर्पोरेट ऑफिसची बिल्डिंग चांगलीच हादरली. यात 16 लोकांचा मृत्यू देखील झाला.

भुकंपाचा हा धक्का किती तीव्र होता याचा अंदाज या व्हिडिओतून येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिकार देशाची राजधानी मनीला येथील आहे. मनीला येथील टोलेजंग इमारतीच्या 53 व्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमधील पाणी भूकंपाच्या धक्कामुळे अचानक खाली वाहू लागले.

पहा व्हिडिओ:

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील अंदमान निकोबार बेटावर रात्रीपासून सकाळपर्यंत विविध तीव्रतेचे भूकंपाचे 18 हादरे बसले होते.