Ratan Tata and His Pet Dog GOA | X

उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata)  श्वानप्रेमी होते. त्यांच्या पार्थिवाजवळ देखील 'गोवा' (Goa)  हा त्यांचा पाळीव कुत्रा आणण्यात आला होता. पण मागील काही दिवसांत रतन टाटा यांचा हा कुत्रा देखील दगावल्याचं वृत्त सोशल मीडीयात वायरल होत आहे. मात्र मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टर Sudhir Kudalkar यांनी 'गोवा' या रतन टाटांच्या श्वानाबद्दल वायरल होत असलेले वृत्त खोटं असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर हा खुलासा केला आहे. दरम्यान वायरल होत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मध्ये 'दु:खद बातमी, टाटा यांचा पाळीव कुत्रा गोवा त्यांच्या मृत्यू पश्चात 3 दिवसात मृत्यू पावला आहे. म्हणूनच म्हणतात माणसांपेक्षा त्यांच्या मालकाशी कुत्रे अधिक एकनिष्ठ असतात.'

'गोवा' टाटांसाठी खास होता

टाटा यांच्या मुंबई मधील ' बॉम्बे हाऊस' या हेडक्वार्टर मध्ये 'गोवा' होता. रतन टाटा गोव्यामध्ये असताना त्यांना हा कुत्रा दिसला.ते गोव्यात असताना हा कुत्रा देखील त्यांच्यासोबत राहत होता. त्यामुळे त्यांनी त्याला आपल्यासोबत मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याला नाव देखील 'गोवा' दिले. नक्की वाचा: Ratan Tata Pet Dog: रतन टाटा यांचा पाळीव श्वान गोवाने वाहिली श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक .

दरम्यान सुधीर यांनी इंस्टा वर पोस्ट करत आपण शांतनू नायडू (रतन टाटांचे असिस्टंट) यांच्याशी बोलणं केलं आहे त्याने 'गोवा' उत्तम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडीयात फिरत असलेला मेसेज खोटा आहे त्यावर विश्वास न ठेवण्याचं आणि निराधर वृत्त शेअर न करण्याचं आवाहन केले आहे.

पोलिस इन्स्पेक्टर सुधीर कुडाळकर यांची पोस्ट

रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर दिवशी मुंबई मध्ये ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या निधनावर सारा देश हळहळ  व्यक्त करत आहे.