Vangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव
वांगणी रेल्वे स्टेशन अपघात। Photo Credits: Twitter/ANI

मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकामध्ये (Vangani Railway Station)  कर्तव्यदक्ष पॉईंट्समॅन मयूर शेळके (Mayur Shelke) ने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणल्याचा व्हीडिओ सध्या ट्वीटर सह सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. ही 17 एप्रिलची घटना असून मध्य रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. सध्या पॉईंट्समॅन मयूर शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटकर्‍यांनी त्याच्या सहसाला सलाम केला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार ही घटना 2 दिवसांपूर्वीची वांगणी रेल्वेस्थानकामधील आहे. एक अंध महिला संध्याकाळी 5 च्या सुमारास वांगणी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवरून चालत होती. तिच्यासोबत एक मुलगा होता. तो प्लॅट्फॉर्मच्या कडेला जाऊन तोल न सावरू शकल्याने रूळावर पडला. इतक्यात समोरून एक ट्रेन येत होती. मुंबई डिव्हिजनचे पॉईंट्समॅन मयूर शेळके यांनी हा प्रकार पाहताच चिमुकल्याकडे धाव घेतली आणी त्याला मदतीचा हात देत प्लॅटफॉर्मवर खेचले. त्यावेळी जवळच असलेले काही जण मदतीला धावून आले आणि जीवावर बेतू शकणारा मोठा अनर्थ टळला. (नक्की पहा: Rail Accident: वेगवान एक्सप्रेस ट्रेन खाली बाईकचा क्षणात चक्काचूर झाला; दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला; पहा काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघाताचा व्हिडिओ).

रेल्वे मंत्री पियुष गोयल ट्वीट

स्वप्नील जोशी ट्वीट

साहसाला सलाम

दरम्यान रेल्वे स्थानकामध्ये रूळ ओलांडताना अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवरील कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांनी प्रवाशांना मदतीचे हात दिल्याचे अनेक व्हीडिओ पहायला मिळाले आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार अशाप्रकरे रेल्वे रूळ ओलांडणं हा दंडनीय अपराध आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर जनजागृतीचं काम केले जात आहे.