Propose Day 2020: महाराष्ट्र पोलिसांनी दिल्या प्रपोज डे च्या मजेशीर शुभेच्छा; पहा त्यांचा 'हा' कुल अंदाज
maharashtra police (संग्रहित छायाचित्र)

एखाद्याला सरळ सांगून जी गोष्ट पटत नाही ती थोडे टोमणे मारून सांगितली की आपोआप पटते, हा एक सर्वसाधारण अनुभव आपण साऱ्यांनी घेतला असेल, याचा वापर करून महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) साऱ्यांना आज एक इशारा दिला आहे. तुम्हाला ठाऊकच असेल की काल पासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) ला सुरुवात झाली आहे, आज या वीक मधील प्रपोज डे (Propose Day) आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाची कबुली देऊन त्याच्या तिच्या साथीसाठीची मागणी यादिवशी केली जाते. याच दिवसाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून एक मजेशीर ट्विट करण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवण्यासाठी Super Mario थीम चा वापर करून BMC चे वोट अपील, पहा हा व्हिडीओ

"#ProposeDay ला आयुष्याचा जोडीदार शोधा, गुन्हेगारीतला भागीदार नाही" असे हे ट्विट आहे. यासोबतच ट्विट मध्ये #ChooseWisely #ProposeDay2020 हे हॅशटॅग सुद्धा लिहिण्यात आले आहे. यावर एका व्यक्तीने पोलिसांना आपल्याला जोडीदार शोधण्यासाठी रेफरेन्स द्या अशी विनंती केली असता त्यालाही पोलिसांनी उत्तर देत हे काम तुम्हीच करू शकता आमच्याकडे फक्त गुन्हेगारच असतात असे म्हंटले आहे.

महाराष्ट्र पोलीस ट्विट

या आधी कबीर सिंह सिनेमात जेव्हा प्रीतीला वाचवायला कबीर बाईकवरून सुसाट जातो असे दृश्य दाखवण्यात आले आहे त्याचा फोटो वापरून शाहिदच्या डोक्यावर मॉर्फ केलेले हेल्मेट चढवण्यात आले होते, तसेच आधी स्वतःला वाचव आणि मग प्रीतीला असे सांगून हेल्मेट वापरण्याच्या बाबत जागृती करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. याचप्रकारे अमली पदार्थांचे सेवन करू नका असे सांगतही रत्नागिरी पोलिसांनी एक मीम पोस्ट केला होता.

रत्नागिरी पोलिस ट्वीट

वेळेनुसार बदलणाऱ्या पोलिसांच्या या नव्या रूपाचे नेटवर भारीच कौतुक केले जात आहे.