OnlyFans वरील Porn Star Sinead Connell ने मांडली आपली व्यथा; म्हणाली- 'इथे बरेच पैसे मिळतात मात्र...'
Porn Star Sinead Connell (संग्रहित संपादित प्रतिमा)

अडल्ट फिल्म इंडस्ट्री (Adult Film Industry) बाहेरून जशी चमकदार आणि आकर्षक दिसते, तशी ती आतून अजिबात नाही. अनेक पॉर्न स्टारच्या (Porn Star) मते ही एक दलदल आहे जिथे एकदा कोणी अडकले की त्याचे बाहेर पडणे अवघड आहे. जेव्हा प्रसिद्ध पॉर्न स्टार अभिनेत्री मिया खलिफाने या इंडस्ट्रीशी आपले संबंध तोडले, तेव्हा तिने इंडस्ट्रीशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित अनेक लोकांनी वेळोवेळी सांगितले आहे की, या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी त्यांना भरपूर पैसे मिळतात पण त्यांना सन्मान मिळत नाही. आता असेच काहीसे अजून एका पॉर्न स्टारने सांगितले आहे.

41 वर्षीय आयर्लंडची प्रसिद्ध पॉर्न चित्रपट अभिनेत्री सिनेड कॉनेल (Sinead Connell) ही 4 मुलांची आई आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की अडल्ट चित्रपट उद्योगात काम करण्याचे अनेक फायदे आणि अनेक तोटे आहेत. एकेकाळी बॉडीबिल्डर म्हणून काम करणारी सिनेड आता ओन्ली फॅन्सवर (OnlyFans) आपले व्हिडिओ पोस्ट करून एका महिन्यात एक कोटी रुपयांहून अधिक कमावते. आता तिने या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनोवृत्तीबद्दल सांगितले आहे.

तिने म्हटले की, ‘मी ओन्ली फॅन्सबाबत बरेच ऐकले होते पण मला माहित नव्हते की ते माझ्यासाठी खूप चांगले व्यासपीठ ठरेल आणि माझ्या जीवनाचा एक भाग बनेल. मात्र यामुळे मला आपल्या प्रियजनांच्या रागाला आणि रोषालाही सामोरे जावे लागले.’

सिनेड पुढे म्हणाली की, ‘पॉर्न चित्रपट उद्योगातील माझ्या कामामुळे लोक माझा तिरस्कार करतील अशी मला अपेक्षा नव्हती. माझ्या वडिलांना जेव्हा माझ्या कामाबद्दल समजले तेव्हापासून ते माझ्याशी बोलत नाहीत. त्यांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. ते सध्या 80 वर्षांचे आहेत आणि या वयात त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केल्याने मी प्रचंड दुःखी आहे. तसेच इतरही अनेक जवळचे लोक माझ्यापासून दूर गेले आहेत.' (हेही वाचा: Porn Star Abella Danger ने ठेवले आपल्या अनेक मित्रांच्या भावांसोबत लैंगिक संबंध; आता तुटली आहे सर्वांसोबतची मैत्री (Watch Video)

शेवटी ती म्हणाली, ‘आता पैसे हे कारण असो वा आणखी काही असो, मला ही इंडस्ट्री आवडत आहे. इथेही मेहनत आहे व ती मी करत आहे. मला नाही वाटत मी कधी 9-5 असे ऑफिस काम करू शकेन.’