Poonam Pandey Is Engaged to Boyfriend Sam Bombay (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर आपले हॉट, सेक्सी फोटोज आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असणारी पूनम पांडे (Poonam Pandey) आता एका वेगळ्याच प्रकरणाबाबत चर्चेत आहे. पूनम आता आपल्या आयुष्याबद्दल थोडी सिरीयस झाल्याचे दिसत आहे. पूनमने नुकतेच आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे  (Sam Bombay) सोबत साखरपुडा (Engagement) केला आहे. सॅमने पूनमसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, यात दोघांनी एंगेजमेंट रिंग्ज परिधान केलेली दिसत आहे. सॅमने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे, ‘अखेर आम्ही केलेच’, यावर पूनमने ‘बेस्ट फीलिंग’, अशी कमेंट केली आहे.

पहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A kiss is greater than a rose.

A post shared by Sam Bombay (@sambombay) on

हा फोटो पाहून अनेक लोक, त्यांचे चाहते पूनम पांडे आणि सॅमचे अभिनंदन करत आहेत. लोक त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत. याआधी पूनम आणि सॅमचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दिसणारी दोघांची केमेस्ट्री पाहून दोघांमधील प्रेम किती गहिरे आहे याची जाणीव होते. गेले अनेक महिने पूनम व सॅम एकमेकांना ओळखत आहेत व आता या दोघांनी साखरपुडा केला. (हेही वाचा: पूनम पांडे हिचा बॉयफ्रेंड सोबतचा 'टॉपलेस' फोटो सोशल मिडियावर व्हायरल, कॅप्शन वाचून चाहते पडले संभ्रमात)

 

View this post on Instagram

 

We finally did it!

A post shared by Sam Bombay (@sambombay) on

पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे आपल्या विद्यार्थ्यावर प्रेम जडते. आता बातमी मिळत आहे की, नशा 2 या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पूनमने हिंदीशिवाय तेलगू आणि कन्नड चित्रपटातही काम केले आहे. पूनम पांडेने गोविंदाच्या ‘आया गया हीरो’ या चित्रपटाच्या गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली होती. दरम्यान, याआधी लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पूनम पांडेला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने, तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र नंतर स्वतः पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर करत हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले होते.