पाळीव कुत्र्याचा (Pet Dog) प्रवास सुखकर होण्यासाठी मालकाने एअर इंडियाची (Air India) संपूर्ण बिजनेज केबिन (Business Cabin) बुक केली असल्याची घटना समोर येत आहे. मुंबईहून चेन्नईला (Mumbai to Chennai) जाण्यासाठी ही केबिन बुक केल्याचे समजते. विशेष म्हणजे केवळ दोघांच्या प्रवासासाठी मालकाने तब्बल 2.5 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. त्यामुळे सर्वात जास्त आपल्या कुत्र्यावर कोण प्रेम करतं, हा पुरस्कार द्यायचा ठरवल्यास या कृतीचा नक्कीच विचार करता येईल.
Maltese Snowy Furball या प्रजाती हा कुत्रा आहे. याने बुधवारी सकाळी 9 वाजता मुंबई एअरपोर्टवरुन सुटणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI-671 विमानाने प्रवास केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एअर इंडिया A-320 एअरक्रॉफ्टमध्ये जे क्लास केबिनच्या एकूण 12 सीट्स असतात. मुंबई ते चेन्नई प्रवासासाठी एअर इंडिया फ्लाईटच्या बिजनेस क्लास तिकीटासाठी सुमारे 20 हजार रुपये मोजावे लागतात. एअर इंडियाच्या फ्लाईट पॉलिसीनुसार, कुत्रे, मांजरी आणि पक्षी यांना विमानाने प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु, या प्राण्यांचे व्हॅसिनेशन सर्टिफिकेट सोबत असणे गरजेचे आहे.
एका प्रवाशाला दोन पाळीव प्राणी सोबत नेण्याची परवानगी आहे. प्राण्यांच्या शरीराच्या आकारानुसार, त्यांना केबिनमध्ये किंवा कार्गो मधून नेता येऊ शकते. बिजनेस क्लास मधून प्रवास करणारे प्राणी केबिनच्या शेवटच्या रो मध्ये बसलेले असतात. यासोबतच भावनिक आधार देणाऱ्या प्राण्यांना सुद्धा काही एअर लाईन्स प्रवासाची मुभा देतात. (नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात 11 वर्षांच्या सेवेनंतर निरोपाच्या क्षणी Sniffer Dog भावूक; पहा Video)
मागील वर्षी कोरोना संकटामुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. या कारणामुळे बहुतेक प्राणी आपल्या मालकांपासून दुरावले गेले होते. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सायबर सिक्युरिटी रिसर्चर यांनी 6 वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांना मुंबई ते दिल्ली विमानाद्वारे त्यांच्या मालकांकडे पोहचवण्याचे कार्य केले.