पीपीई किट घातलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला भूत समजून जोरजोराने ओरडू लागली महिला; त्यानंतर झाले असे काही (Watch Video)
Viral Video Grab (Photo Credits: Twitter)

Funny Video: कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि अगदी इतर कर्मचारीही पीपीई किट (PPE KIt) परिधान करत आहेत. याची आता आपल्याला सवय झाली असली तरी अचानक पीपीई किट मधील आरोग्य कर्मचाऱ्याला पाहून एक महिला भयंकर घाबरली आहे. या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही लोटपोट हसाल. पण त्या महिलेची मात्र चांगलीच भांबेरी उडाली आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने शेअर केला असून 'रुग्णाला वाटते मेडिकल स्टाफला भूत आहे...' असे कॅप्शन त्याला देण्यात आले आहे.

व्हिडिओत हॉस्पिटलच्या रुममध्ये दोन रुग्ण झोपलेले दिसत आहेत. त्या दोघांमध्ये एक पडदा आहे. रुग्णालयातील एक कर्मचारी पीपीई किट घालून रुग्णाजवळ जातो. कर्मचारी जसा पडदा बाजूला सारतो तेव्हात रुग्ण महिला जोरजोरात ओरडू लागते. भूत आलं असं वाटून महिला घाबरून जोरात ओरडत राहते. तिच्या अशा वागण्याचे नर्सिंग स्टाफलाही गडबडून जातो. शेजारी असलेला रुग्णही जागा होतो. तर बाहेरील दुसरा आरोग्य कर्मचारी आत येतो. (Covid-19 रुग्णांना cheer करण्यासाठी आरोग्य सेवकांचा PPE कीट घालून भांगडा; पहा Viral Video)

पहा व्हिडिओ:

हा व्हायरल व्हिडिओ 21 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत 411 वेळा हा व्हिडिओ रिट्विट करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गात रुग्णांची सेवा करताना सुरक्षेसाठी पीपीई किट अत्यंत महत्त्वाचा आहे.