Video: Parasailing Rope Snaps In Alibaug: पॅरासेलिंग करताना तुटली दोरी, हवेतच तरंगली महिला; अलिबाग येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Parasailing Rope Snaps In Alibaug | (Photo Credit: YouTube)

अनेकांना धाडसाचे (Adventure) मोठे कौतुक. त्यासाठी ही मंडळी स्वत:हून थरार पसंत करतात. कधी कधी त्या थरारासोबत येणारे धोकेही स्वीकारतात. अलिबाग (Alibaug Viral Video) येथे दोन महिलांसोबत असेच घडले. या महिला अलिबागच्या समुद्रात (Alibaug Sea) पॅरासेलिंग करत होत्या. दरम्यान, हवेतच दोरी तुटली आणि हवेत उडणाऱ्या या महिला थेट समुद्राच्या पाण्यातच पडतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच, पॅरासेलिंग (Parasailing Viral Video) करताना काळजी घेतली नाही तर, काय घडू शकते याची प्रचिती देणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींना धक्काही बसला.

व्हिडिओत आपण पाहू शकता पॅरासलिंग करणाऱ्या या दोन्ही महिला हवेत उंच उडत आहेत. दरम्यान, महिला हवेत असताना अचानकच दोरी तुटली आणि महिला थेट खाली समुद्राच्या पाण्यात पडल्या. पॅरासेलींग करताना सुरुवातीला नेहमीप्रमाणेच सर्व काही सर्वसामान्य होते. मात्र, हळूहळू महिला हवेत वर वर जाऊ लागली आणि काही सेकंदातच पॅरॅशूटसोबत असलेली रस्सी नावेतून बाहेर येणे थांबते आणि ती रस्सीच तुटते. उंच हवेतून खाली पडतानाचे महिलांचे हे दृष्य इतके भीतीदायक आहे की अनेकांच्या अंगावर काटा येऊ शकतो. (हेही वाचा, सांगलीच्या जुगाड मिनी जीप बनवणार्‍याच्या कल्पकतेला Anand Mahindra कडून कौतुकाची थाप; पण नियमात न बसणार्‍या या गाडीला मागवत Bolero भेट देण्याची घोषणा)

व्हिडिओ

प्राप्त माहितीनुसार, ज्या महिलांसोबत हा प्रकार घडला त्या दोन्ही महिला मुंबई (Mumbai) येथील साकीनाका येथील राहणाऱ्या आहेत. दोघीही आपल्या कुटुंबीयांसोबत आलीबागला आल्या होत्या. या वेळी त्यांच्यासोबत ही घटना घडली. Manoranjan Katta नावाच्या युट्युब चॅनलवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4.1 मिलियन पेक्षाही पोहिला आहे.