Shazia Manzoor Slaps Sherry Nanha: पाकिस्तानी गायिका शाजिया मंजूर हिने लाईव्ह टीव्ही शोमध्ये सह-होस्ट शेरी नन्हाला थप्पड मारली; Video Viral
Shazia Manzoor Slaps Sherry Nanha | (Photo Credits: X)

प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका शाजिया मंजूर (Shazia Manzoor) सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या कुठल्या गाणे अथवा कार्यक्रमामुळे नव्हे तर तिने एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात सह-निवेदकासोबत केलेल्या वर्तनामुळे आहे. सांगितले जात आहे की, 'पब्लिक डिमांड' या एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात चर्चा करताना तिच्या को-होस्टला जोरदार थप्पड (Singer Shazia Manzoor Slaps Co-host Sherry Nanha) लगावली. शाजिया मंजूर ही तिच्या तिच्या विनोदी व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते. ही घटना घडली तेव्हा शेरी नन्हा (Sherry Nanha) तिच्यासोबत कार्यक्रम करत होता. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हनिमूनच्या टीप्पणीवरुन वाद

पाकिस्तानमधील घटनेच व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, शेरी नन्हा एक विनोदी टीप्पणी करत शाजिया मंजूर हिस हनिमूनला मॉन्टे कार्लोला घेऊन जाण्याबद्दल बोलतो आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला. हनिमूनवरुन टीप्पणी होतच शाजिया भडकली. तिने कार्यक्रम सुरु असतानाच को-होस्टला थप्पड लगावली. ती केवळ एकच थप्पड लगावून थांबली नाही. तिने संतापाने काही वाक्येही हिंदीमध्ये उच्चारली. त्याचा मराठी भावार्थ असा की, 'हा मनुष्यच घाणेरड्या मनोवृत्तीचा आहे. इथे तो मला हनिमूनबद्दल बोलतो आहे. याच्या या वर्तनामुळेच मी पाठिमेगेही एकदा याला रागे भरले होते.' संतापाने भडकलेली शाजिया को-होस्टला आणखी फटके लगावते. (हेही वाचा, Maryam Nawaz: मरियम नवाझ पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री; वय, राजकीय वारसा आणि भूमिका घ्या जाणून)

सह-कलाकारांनीही नन्हाला झापले

शाजिया मंजूर आणि शेरी नन्हा यांच्यातील वाद होस्ट मोहसीन अब्बास हैदरच्या हस्तक्षेपापर्यंत वाढत गेला. मोहसीन यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळण्यास मदत झाली. व्हिडिओमध्ये असेही पाहायला मिळते की, इतर सहकलाकार तिथे येतात आणि मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करतात. मोहसीन यांनी 'भाई तू स्वत:ची वाक्ये बोलू नको.. जे संहितेमध्ये लिहीले आहे तेच बोलत चल.. तुला किती वेळा सांगीतले', अशी आठवणही नन्हा यास करुन दिली. दरम्यान, होस्ट मोहसीन हैदरच्या प्रयत्नांना न जुमानता, मंजूरने अचानक स्टुडिओ सोडला आणि कार्यक्रमात परतण्याची तिची इच्छा नसल्याचे जाहीर केले. (हेही वाचा, Pakistan Child Marriage: पाकिस्तानात बालविवाहावरून खळबळ! 13 वर्षाच्या मुलाचा 12 वर्षाच्या मुलीची विवाह, व्हिडिओ व्हायरल (Watch))

घटना इंटरनेटवर व्हायरल

कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही घटना इंटरनेटवर प्रसारित केली गेली. ज्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, असे काही वास्तवात घडले असण्याची शक्यता कमी आहे. केवळ प्रँक किंवा कार्यक्रमाचा भाग म्हणून हे स्क्रीप्ट (संहिता) मध्येच लिहीले असावे. त्यानुसारच या कलाकारांनी हे वर्तन केले असावे. (हेही वाचा, Woman Attacked In Lahore Hotel: लाहोरमधील हॉटेलमध्ये महिलेवर जमावाचा हल्ला; ईशनिंदेचा आरोप (Watch Video))

व्हिडिओ

शाजिया मंजूर पाकिस्तानी संगीतातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणून वाहवा मिळविली आहे, ज्यात "बतियां बुझाई रख दी," "चान मेरे मखना," आणि "बल्ले बल्ले" सारख्या हिट एकल गाण्यांनी संपूर्ण पाकिस्तान आणि त्यापलीकडे प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.