मागच्या वर्षी कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लॉक डाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी कित्येक महिने लोक घरातच बंद होते. अशावेळी रस्त्यावरील रहदारी, प्रदूषण कमी झाल्याने अनेक प्राणी व पक्षी मानवांच्या वस्तीमध्ये मुक्तपणे संचार करताना आढळले होते. आता अशीच काहीशी घटना पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीमध्ये (Karachi) घडली आहे. कराचीमधील प्राणिसंग्रहालयातून पळून गेलेला शहामृग (Ostrich) एका रहदारीच्या रस्त्यावर विहार करताना दिसून आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 5 जानेवारी रोजी ही घटना घडली.
मूळ आफ्रिकेमधील असलेला ‘शहामृग’ हा पक्षी कराची शहरातील एका खाजगी प्राणीसंग्रहालयातून निसटला आणि वाहतुकीच्या, गर्दीच्या रस्त्यावर धावू लागला. स्थानिक वृत्तानुसार, ही घटना शहरातील कोरंगी क्रमांक 4 मध्ये मंगळवार, 5 जानेवारी रोजी घडली. हा शहामृग एका खाजगी प्राणीसंग्रहालयाच्या खोलीत होता. या ठिकाणी पाणी शिरल्यानंतर तो भयभीत झाला व बिचारा आपला जीव वाचवण्यासाठी तिथून निसटून चक्क रस्त्यावर धावू लागला. (हेही वाचा: स्लायडिंग करताना छोट्या हत्तीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल; पाहून तुमच्याही चेहऱ्यावर खुलेल हास्य)
Meanwhile an ostrich on roads of #Karachi. Having a free run. It’s real. pic.twitter.com/mR1UVgnpGr
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 7, 2021
परंतु एखाद्या गर्दीच्या रस्त्यावर शहामृग धावणे ही नक्कीच रोज-रोज आढळणारी गोष्ट नाही. त्यामुळे हे दृश्य दिसल्यावर अनेकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडीओ शूट केले व ते सोशल मिडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओला साधारण 2600 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांना या पक्षाची दया आली आहे मात्र काही लोकांनी हा शहामृग आपले स्वातंत्र्य अनुभवत असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याचसोबत काहींनी या प्राणिसंग्रहालयाची स्थिती आणि इथले प्राणी व पक्षी यांच्या असुरक्षितेबाबत तक्रार केली आहे. काही काळानंतर पार्कच्या कर्मचाऱ्यांनी या पक्षाचा पाठलाग केला व त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुन्हा प्राणिसंग्रहालयात आणले गेले.