Baby Elephant Sliding Video: स्लायडिंग करताना छोट्या हत्तीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल; पाहून तुमच्याही चेहऱ्यावर खुलेल हास्य
Baby Elephant Sliding (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर  (Social Media) अनेक विविध व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. त्यामुळे असे व्हिडिओज पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होते. असाच एक क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लहान हत्ती (Baby Elephant) स्लायडिंग (Sliding Down) करताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी (Indian Forest Service) सुशांत नंदा  (Susanta Nanda) यांनी ट्विटरवर शेअर केल आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, "जेव्हा आपण गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला तेव्हा मुलांनी खाली सरकायला सुरुवात केली नाही. तर त्यांनी नेहमी हे असे केले. दरम्यान, हत्तीचा हा स्लायलिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे."

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, हा छोटा हत्ती खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र घसरटी वाट पाहून तो आपली बॉडी अगदी फ्री सोडून देतो आणि घसरत खालपर्यंत जातो. लहान मुलं घसरगुंडीचा आनंद घेतात त्याप्रमाणे हा छोटा हत्ती देखील स्लायडिंगचा पुरेपूर आनंद घेत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्याला 4.7k व्हूज, 80 रिट्विट्स आणि 695 लाईक्स मिळाले आहेत. (Snake Fight Viral Video: नागिन सापाला भुरळ घालण्यासाठी दोन विषारी साप आपसात भिडले; पहा जबरदस्त लढाईचा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

यापूर्वी प्राण्यांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात कधी त्यांचा क्यूटनेस, कधी दयाभाव तर कधी मदत करण्याची वृत्ती तर कधी हिंस्र वृत्ती पाहायला मिळाली. या व्हिडिओत छोट्या हत्तीचा निरासगपणा दिसून येतो.