A heartbreaking incident in Hyderabad

OMG: हैदराबादमधील एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराची दुचाकी एका भरधाव ट्रकखाली अडकल्याने तो थोडक्यात बचावला. हैदराबादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली अडकली. बाईक ट्रकखाली अडकते, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ट्रकच्या फूटबोर्डवर चढून दुचाकीस्वार आपला जीव वाचवतो.

पाहा व्हिडीओ: 

हा व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करत असून बाइकस्वाराच्या धैर्याचे आणि नशिबाचे कौतुक केले जात आहे. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणावरही काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत. रस्त्यावर सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देणारी ही घटना आहे. छोटीशी चूकही किती जीवघेणी ठरू शकते हे यातून दिसून येते.