इस्लामासाठी मनोरंजन विश्वाला रामराम ठोकणारी माजी भारतीय अभिनेत्री सना खानने (Sana Khan) लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. 21 नोव्हेंबर रोजी सना खानने सूरतमध्ये मुफ्ती अनसशी (Mufti Anaas) लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी या जोडप्याचे हनिमूनचे फोटोही व्हायरल झाले. आता अशाच काही फोटोंबाबत सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मिडियावर सनाच्या खानच्या बोल्ड फोटोंचा कोलाज व्हायरल होत आहे व हा कोलाज तिच्या मुस्लिम धर्मगुरु पतीने पोस्ट केल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता माहिती मिळत आहे की, या कोलाजमधील तीनपैकी दोन फोटो हे जुने असून ते सनाच्या हनिमूनचे नाहीत.
हा एकूण तीन फोटोंचा कोलाज असून, यातील दोन फोटो हे अतिशय बोल्ड आहेत. त्यामध्ये सनाने फक्त ब्रा घातल्याचे दिसत आहे. तिसरा फोटो या जोडप्याच्या हनिमूनचा असून ते बर्फामध्ये मौजमस्ती करताना दिसत आहेत. अनेकांनी हा कोलाज सोशल मिडियावर शेअर करून सनाचे हे हनिमूनचे फोटो आहेत व ते तिच्या पतीने पोस्ट केले असल्याचा दावा केला होता. मात्र जेव्हा याबाबत तपास केला गेला तेव्हा यातील दोन्ही बोल्ड फोटो हे जुने असल्याचे निष्पन्न झाले.
हनीमून की ऐसी नंगी-पुंगी अपनी पत्नी की तस्वीरे कोई पति कैसे शेयर कर सके सकता है???🤔 सना खान का पति ऐसा कर रहा!! pic.twitter.com/WpCgWJ97e5
— 🌞Jयोति🇮🇳Aries🌞{लावण्या} (@_sujyoti1) December 15, 2020
फोटो कोलाज बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की, या फोटोंवर ‘एबीपी न्यूज’ या न्यूज वेबसाइटचा लोगो आहे. म्हणजेच एबीपी न्यूजच्या या फोटोंच्या कोलाजचा तसेच बातमीचा स्क्रीनशॉट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एबीपी न्यूजवर ही बातमी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित झाली व त्यांनतर हे फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली. मात्र या बातमीमधील सर्व फोटो हे सनाच्या सध्याच्या हनिमूनचे आहेत परंतु एबीपीने यासाठी जो कव्हर फोटो वापरला आहे त्यामध्ये सनाचे जुने फोटो वापरले गेले. (हेही वाचा: सना खान आपल्या हनिमूनसाठी पोहोचली काश्मीर, पतीसह शेअर केला 'हा' खास व्हिडिओ)
यातील एक फोटो हा ‘वजह तुम हो’ या चित्रपटातील असून, दुसरा फोटो हा सनाच्या 2017 सालच्या फोटोशूटचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या बातमीसाठी एबीपीने दोन जुने फोटो वापरून नव्या चर्चेला उधाण आणले आहे. मात्र युजर्सनीदेखील या गोष्टीची खातरजमा न करता ते व्हायरल करायला सुरुवात केली.