Video Screengrab of Hyderabad Pub (Photo Credits: @rishibagree/ Twitter)

सध्या आपण सर्वजणच कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या रोगाच्या मध्यावर आहोत. जरी संक्रमणाचे प्रमाण कमी होत असले, तरी यातून बाहेर पडण्याची ही प्रक्रिया सोपी नाही. सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत मात्र याचा अर्थ असा नाही की, आपण सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरस मार्गदर्शक तत्वांचे पालन करायचे नाही. सध्या देश अनलॉकच्या टप्प्यात आहे. हैदराबाद (Hyderabad) मध्ये पब (Pu) आणि बार उघडले गेले आणि त्यांनी पुन्हा आपले कामकाज सुरू केले. गेले काही महिने हे क्लब व बार बंद असल्याने आत इथे गर्दीचे प्रमाण वाढत आहे. मात्र नुकताच हैद्राबाद येथील एका क्लबचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सर्व कोरोना मार्गदर्शक नियम धाब्यावर बसवून तरुणाई मजेत एन्जॉय करताना दिसत आहे.

सध्या सोशल मिडियावर या गोष्टीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हैद्राबाद शहरातील एका अज्ञात पबमध्ये हा व्हिडिओ शूट केला गेला. यामध्ये दिसून येत आहे, इथे तरुण मुला-मुलींची प्रचंड गर्दी आहे व यातील फक्त 2-3 लोक सोडून कोणीही तोंडाला मास्क लावला नाही. यासह सामाजिक अंतराचेही कोणाला भान नाही. या व्हिडिओ पाहून नेटिझन्सना मोठा धक्का बसला आहे. कोरोना विषाणूचा हाहाकार अजूनही देशात चालू आहे, अजूनही यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. अशात या रोगाचा प्रसार होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी देशातील नागरिकांची आहे. सोशल मिडीयावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पहा व्हिडिओ -

याआधी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लॉक डाऊननंतर हैद्राबादमधील पब्ज व क्लब सुरु झाले आहेत मात्र इथे भेट देणारे लोक सांगतात की, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. सामाजिक अंतर, मास्कचा वापर अशा नियमांची इथे पायमल्ली होताना दिसत आहे. (हेही वाचा: पाळलेल्या अजगरासोबत 8 वर्षांच्या मुलीचे स्विमिंग; थक्क करणारा 'हा' व्हायरल व्हिडिओ नक्की पहा)

महत्वाचे म्हणजे यातील बहुतेक लोक हे शिक्षित तरुण-तरुणी आहेत. सध्या सरकार कोरोना विषाणूबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे मात्र इथल्या लोकांना त्याचे कहीही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे संसर्गाचे प्रमाण अजून वाढू शकते, असे अनेक युजर्सनी म्हटले आहे.