New Zealand Police थिरकले बॉलिवूडच्या Kala Chashma गाण्यावर; माधुरी दीक्षित ने शेयर केला Video
माधुरी दीक्षित (Photo Credits: Twitter, Facebook)

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकताच आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये न्यूझिलंडच्या दिवाळी 2020 च्या सेलिब्रेशनमध्ये पोलिस अधिकारी चक्क बॉलिवूडच्या 'काला चश्मा' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 2016 साली रिलीज झालेल्या 'बार बार देखो' या चित्रपटात मूळ गाण्यावर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ झळकली होती. पण न्यूझिलंडमध्ये वेलिंग्टन इंडियन असोसिएशन द्वारा शेअर केलेल्या एका व्हिडिओ मध्ये चक्क तेथील पोलिसांनी (New Zealand Police) ठुमके लावले आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'हा व्हिडिओ पाहून माझ्या चेहर्‍यावर एक मोठी स्माईल आली आहे. डान्स, आर्ट आणि संस्कृती लोकांना किती शानदार पद्धतीने एकजूट ठेवते. माधुरी दीक्षितने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षित ट्वीट

सिद्धार्थ मल्होत्रा ट्वीट

कामाच्या बाबतीत मागील वर्षी माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अनेक वर्षांनी कलंक मध्ये एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. पण माधुरीची डांसिंग स्टाईल आणि अभिनयाने पुन्हा सार्‍यांची मनं जिंकली आहेत.