Tesla India चे नेटकऱ्यांकडून फनी मीम्स आणि जोक्स द्वारे स्वागत!
Tesla in India Memes (Photo Credits: Twitter)

इलॉन मस्क (Elon Musk) च्या टेसला (Tesla) कंपनीने भारतात प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या नामांकित इलेक्ट्रीक कार कंपनीने बंगळुरु मध्ये टेसला इंडिया मोटार्स आणि इनर्जी प्रा. लि. (Tesla India Motors and Energy Private Ltd.) या नावाने रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत भारताच्या रस्त्यांवर टेसला मॉडल कार्स धावणार आहेत. ही खरंच खूप मोठी बातमी असून भारतीय बाजार आणि कार लव्हर्ससाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी या बातमीचे स्वागत फनी मीम्स आणि जोक्सच्या (Funny Memes & Jokes) माध्यमातून केले आहे. भारतातील रस्ते, ट्रॅफिक आणि त्यामुळे टेसला कार्सची होणारी परिस्थिती त्यांनी मीम्सद्वारे व्यक्त केली आहे.

कर्नाटकातील बंगळुरु हे देशातील टेक्नॉलॉजी हब आहे. अनेक आयटी कंपन्या, व्यवसाय बंगळुरु मध्ये स्थित आहेत. त्यात आता टेसला कंपनीचीही भर पडली आहे. परंतु, हे शहर गर्दी आणि ट्रॅफिकसाठी देखील प्रचलित आहे. याचाच संबंध जोडत नेटकऱ्यांनी मीम्स सोशल मीडियावर व्हायल केले आहेत. (अखेर Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी Tesla ची भारतामध्ये एन्ट्री; बेंगळुरू येथे थाटले कार्यालय, तीन संचालकांची नावे जाहीर)

व्हायरल फनी मीम्स आणि जोक्स:

हे सर्व हास्यास्पद वाटत असलं तरी रस्त्यांची स्थिती सुधारणे देखील टेसलाच्या इलेक्ट्रीक कार्स भारतातील रस्त्यांवर सुरळीत चालण्यासाठी रस्त्यांची स्थिती सुधारणे देखील तितकेच आवश्यक आहे.