नेपाळच्या शाही परिवाराला लागले TikTok चे वेड; माजी राजकुमारीचा आपल्या दोन मुलींसोबतचा टिक टॉक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
हिमानी शाह Tok Tok (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या टिक टॉक (TIKTOK) हे जगातील सर्वाधिक डाउनलोड केल्या जाणाऱ्या App पैकी एक बनले आहे. टिक टॉकची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, कोट्यावधी लोकांच्या फोनमध्ये हे App दिसून येते. टिक टॉकची ही क्रेज आता नेपाळच्या शाही परिवारापर्यंत (Royal Family) पोहचली आहे. सध्या नेपाळची माजी राजकन्या हिमानी शाह (Himani Shah) आणि तिच्या दोन मुलींचा नेपाळी गाण्यावर नाचत असल्याचा, टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिमानी पहिल्यांदाच टिक-टॉकवर दिसली आहे. तिची मुलगी पूर्णिकाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हिमानी नेपाळच्या सिंहासनाचा तत्कालीन वारस माजी राजकुमार पारस याची पत्नी आहे.

हिंदुस्तानात जन्मलेली हिमानी व्हिडिओमध्ये आपल्या मुली पूर्णिका आणि कृतिका सोबत 'गुरुस को फेड मुनी' या नेपाळी गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.सध्या हिमानी थायलंडमध्ये अडकली आहे. कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक प्रवास करण्याच्या बंदीमुळे, हिमानी थायलंडमध्येच आहे. तिथे उच्च शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलींना भेटायला ती गेली होती. 43 वर्षीय हिमानी या व्हिडिओमध्ये इतकी कुल दिसत आहे की, ती या दोन मुलींची आई आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. (हेही वाचा: Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class)

पहा व्हिडिओ -

पूर्णिकाच्या या व्हिडिओला बुधवारपर्यंत 49 लाईक्स मिळाल्या आहेत, 3438 लोकांनी तो शेअर केला आहे तर, 1800 लोकांनी त्यावर कमेंट केली आहे. यावेळी नेपाळमध्ये असलेले माजी प्रिन्स पारस शहा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हिमानीचा असाच एक डान्सचा व्हिडिओ कृतिकानेही आपल्या खात्यावर पोस्ट केला आहे व त्याला 23 हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.