Rahul Gandhi in Washim (Photo Credit- Twitter/@amarprasadreddy)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडे यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) त्यांना या यात्रेमध्ये साथ देत आहेत. महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्तेही त्यांच्यासोबत चालताना दिसत आहेत पण काल (16 नोव्हेंबर) वाशिम मध्ये सभेदरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे स्टेजवर राहुल गांधी यांच्यासह सार्‍यांचा गोंधळ उडाला. जन गण मन ऐवजी ऐवजी अचानक नेपाळचं राष्ट्रगीत वाजल्याने सारेच गडबडले. सोशल मीडीयामध्ये सध्या हा व्हिडिओ वायरल होत आहे. नक्की वाचा: 'Daro Mat', Rahul Gandhi's video: 'डरो मत', राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील व्हिडिओ व्हायरल.

 पहा व्हिडिओ

वाशिम मध्ये सभेला संबोधित केल्यानंतर नेहमीप्रमाणे जन गण मन ने सभेची सांगता होणं अपेक्षित होतं. त्यानुसार एका नेत्याने आता 'राष्ट्रगीत' अशी माईक वरून घोषणा देखील केली पण अचानक जन गण मन ऐवजी वेगळीच धून सुरू झाली. ते भारताऐवजी नेपाळचं राष्ट्रगीत होतं. जेव्हा ही गडबड लक्षात आली तेव्हा राहुल गांधी आणि नाना पटोलेंनी तातडीने पुन्हा 'राष्ट्रगीत' असं सांगत जन गण मन सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

राहुल गांधी यांच्या सभेत झालेल्या या गोंधळावरून भाजपा ने त्यांना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी बिसरा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही वीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीपण्णीवरूनही राहुल गांधी महाराष्ट्रात भाजपा कडून टीकेचे धनी झाले आहेत. काल मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच गुंडाळावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.