NEET-UG 2021 Exam Date बाबत NTA च्या नावे खोटं नोटिफिकेशन सोशल मीडीयात जारी; PIB Fact Check ने केला खुलासा
NTA Fake Notification | Twitter/ PIB Fact Check

सध्या कोरोना वायरस जागतिक आरोग्य संकट आणि लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अनेकजण सोशल मीडीयावर खोट्या बातम्या, अफवा पसरवत आहे. मागील काही दिवसात सोशल मीडीया हे दुहेरी शस्त्र असल्याचं प्रकर्षाने समोर आलं आहे. त्यामुळे तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम वर दिसणार्‍या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहे. अनेक परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये एक NEET-UG ची देखील यंदाची परीक्षा आहे. सध्या सोशल मीडीयात ही परीक्षा यंदा 5 सप्टेंबरला होणार असल्याचा दावा करणारे नोटिफिकेशन वायरल होत आहे. पण ते खोटे आहे.

पीआयबी फॅक्ट चेक कडून सोशल मीडीयावरील वायरल नोटीफिकेशन तपासण्यात आले असून एनटीए च्या नावे पसरवले जाणारे हे नोटिफिकेशन खोटं असल्याचं समोर आले आहे. अद्याप एनटीए कडून यंदाच्याNEET-UG परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नसल्याचं सांगण्यात आले आहे.

PIB Fact Check

दरम्यान कोरोना संकटामुळे यंदा 10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्या आहेत. सध्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यातील जेईई मेन्स परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. पण मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा कधी होणार? याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलं आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहून सध्या अनेक निर्णय घेतले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत यंदा परीक्षा देखील पुन्हा घेण्याचा विचार होत असल्याने नीट परीक्षेचे अपडेट्स विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरच नीट पाहता येणार आहेत.