अमुलचं डुडल (Photo Credits: Amul Twitter)

National Milk Day 2018: भारतात दूध क्रांती आणणारे डॉ. वर्गिस कुरियन (Dr Verghese Kurien)  यांचा जन्मदिवस नॅशनल मिल्क डे (National Milk Day)म्हणून साजरा केला जातो. सर्वाधिक दूध उत्पादन करणार्‍या देशांच्या क्रमवारीमध्ये भारताला अग्रगण्य बनवण्यामध्ये डॉ. कुरियन यांचा मोलाचा वाटा आहे. आज नॅशनल मिल्क डे  (National Milk Day)च्या पार्श्वभूमीवर अमुलने खास डुडल बनवलं आहे.

आज वर्गिस कुरियन (Dr Verghese Kurien)  यांच्या 97 व्या जन्मदिनाचं औचित्य साधून अमुलने बनवलेल्या डुडलमध्ये 'अमुल गर्ल' बायकर्सना दूध वाटप करण्याचं चित्र रंगवण्यात आलं आहे. यामध्ये वर्गिस कुरियन हे बॅकड्रॉपला आहेत.

17 नोव्हेंबरपासून जम्मूतून खास बायकर्स रॅली सुरू झाली आहे. गुजरात्मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही बायकर्स रॅली विविध डेअरी फार्म्स व्हिलेज (गावांना) भेट देणार आहे. यामध्ये हिंमतनगर, उदयपूर, गोध्रा येथील पंचमहाल, सुरेंद्रनगर येथील डेअरींना भेट देणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे खास डुडल शेअर करण्यात आलं आहे. वर्गिस कुरियन यांच्या कार्याला आदरांजली वाहताना त्यांचा उल्लेख 'अमुल रत्न' असा करण्यात आला आहे.

डॉ. वर्गिस कुरियन (Dr Verghese Kurien)  यांचं निधन 9 सप्टेंबर 2012 साळी दीर्घ आजारपणामुळे झालं. अमुलची मॅस्कॉर्ट गर्ल आणि त्यांची टॅगलाईन 'Utterly Butterly Delicious'ही देशभरात फारच लोकप्रिय आहे. प्रत्येक महत्त्वाच्या घटनेवेळेस अमुल खास डुडल बनवते.