Naked Ballot: 'या' जाहिरातीमध्ये एक एक करत 9 हॉलीवूड कलाकारांनी काढले स्वतःचे कपडे; Watch Video 
Naked Ballot (Photo Credits: Instagram)

हॉलीवूडच्या एका जाहिरातीची गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे.त्याचे कारणही तसेच आहे.त्या जाहिरातीमध्ये एक हॉलीवूडचा ग्रुप नग्न पहायला मिळत आहे.पेनसिलवेनिया सह अन्य 16 राज्यात 'नेकेड बॅलेट' या मुद्द्यावर मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असल्याचे समजत आहे.या जाहिरातीमध्ये टिफनी हॅडिश (Tiffany Haddish), ख्रिस रॉक (Chris Rock ), अ‍ॅमी शुमर ( Amy Schumer), चेल्सी हँडलर (Chelsea Handler), नाओमी कॅम्पबेल (Naomi Campbell), मार्क रुफॅलो (Mark Ruffalo), सारा सिल्व्हरमन (Sarah Silverman) आणि तिचे वडील डोनाल्ड( donald ), जोश गाड (Josh Gad) आणि रायन मिशेल बाथे (Ryan Michelle Bathe) हे कपड्यांशिवाय पहायला मिळत आहेत.

या जाहिरातीमध्ये या लोकांना पूर्णपणे नग्न न दाखवता ते नग्न आहेत अस भासवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.मेलद्वारे मतदान करताना मतदारांना त्यांची मोजणी करता यावी यासाठी मतदारांना 2 स्वतंत्र लिफाफे वापरावे लागतील याची जाणीव त्यांनी लोकांना करून दिली आहे.या जाहिरातीचे निर्माता सांगतात की 'नेकेड बॅलेट' नियमांमुळे हजारो मेल केलेले मते नाकारण्याचा धोका होता. यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.या जाहिरातीमध्ये कलाकार लोकांना योग्य प्रकारे मतदान कसे करावे हे सांगत आहेत.

अशाप्रकारे मतदानाच्या वेळी पेनच्या रंगाची देखील काळजी घ्यावी लागेल. हा जाहिरातीचा व्हिडिओ बनविण्यामागील उद्देश म्हणजे लोकांचे लक्ष वेधून घेणे. त्यांना मत देण्याचा योग्य मार्ग माहित असावा आणि त्यांचे मत व्यर्थ जाऊ नये हा आहे .सध्या हा व्हिडिओ खूपच चर्चेत आहे.