नागपूर येथील एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ (Nagpur Accident Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video ) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारचालकाचा नजरचुकीने झालेला निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो हे या व्हिडिओतून पाहायला मिळते. कार (Car Acident) मागे (रिव्हर्स) घेताना कारचालकाने ब्रेकच्या ऐवजी चुकून एक्सीलेटर दाबला आणि तो जीवघेना प्रकार घडला. या घटनेत एक तरुन गंभीर जखमी झाला आहे. तर दोघे थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर घडली. मुख्य रस्त्याजवळच्या एका ठिकाणी पार्क केलेली कार मागे घेताना चालकाकडून नजरचूक घडली. कारचालकाने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबला आणि कार वेगाने मागे आली. ही कार काही क्षणांमध्येच इतक्या वेगाने मागे आली की, पाठीमागच्या बाजूला बाकावर बसलेल्या तिघांना स्वत:ला निटसे सावरताही आले नाही. दरम्यान, बाकावरील तिघांपैकी दोघे जण मोठ्या शताफीने बाजूला सरकले. एकाला मात्र ती संधी मिळाली नाही. कार या तरुणाला चीरडून आणघी मागे गेली आणि गोलाकार फिरुन पुन्हा मूळ जागेवर येऊन थांबली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (हेही वाचा, Railway Station CCTV Footage: आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान, ट्रेनखाली येणाऱ्या महिलेचे थोडक्यात वाचले प्राण (पाहा व्हिडिओ))
व्हिडिओ
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आजवर सीसीटीव्हीमध्ये अनेक भयावह अपघात कैद झाले आहेत. त्यापैकीच एक थरारक अपघात असा या अपघाताचा उल्लेख केला जातो आहे. कारच्या आवाजाने आणि आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धाऊन आले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.