Screengrab of viral video | (Photo Credits: Twitter/@Abhischavan)

सध्या सोशल मीडीयावर पालिकेच्या कचरा गाडीतून भाज्या वेचून त्या विकण्यासाठी ठेवल्या जातात अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता समोर आलेली नाही. ट्विटरवर एक युजरने हा किळसवाणा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेलादेखील (BMC) ट्वीट केले आहे.परंतू त्यावर अद्याप पालिका प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याने केलेल्या दाव्यानुसार, हे फूटेज कुलाबा येथील असल्याचं म्हटलं जातं आहे. कुलाबा हा मुंबईतील उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे. अभिजीत चव्हाण या व्यक्तीचा ट्विटर दिलेल्या माहितीनुसार ते भाजपाच्या युथ विंगचे सदस्य आहेत. त्यांच्या ट्वीटमध्ये हा व्हिडिओ कुलाबा मार्केट परिसरात चित्रित केला असल्याचा दावा केला आहे.

कचरा गाडीतून भाजी काढतानाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

युट्युब वरील क्लीप

सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी केलेल्या दाव्यानुसार जर अशाप्रकारे भाज्या कचर्‍यातून वेचून विकण्याचा प्रयत्न होत असेल तर मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. त्यामुळे आपण नेमकं काय खातोय? याबाबत विचार करायला हवा. दरम्यान 'लेटेस्टली'  या व्हिडिओ क्लिपच्या सत्यतेचा दावा करत नाही. वरील माहिती युजर्सच्या दाव्यानुसार केला आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या कुर्ला रेल्वेस्थानकात लिंबू सरबतासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पालिकेने अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई केली होती.