महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यातच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हेतर, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीवर काही नागरिकांचा विश्वासही बसतो. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अशा नागरिकांसाठी त्यांच्या ट्वीटरच्या अकांऊटवर नुकतीच रिलीज झालेली वेबसीरिज पाताल लोकचा (Paatal Lok) मीम शेअर केला आहे. या वेबसीरीजच्या सुरुवातीला पोलीस अधिकारी हाथीराम चौधरी आपले सहकारी इमरान अंसारीला पाताल लोकांच्या संदर्भात समजावत असतात. दरम्यान, ते व्हॉट्सएप वरील बातम्यांचा उल्लेख करतात. हाच डॉयलॉग मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई पोलिसांनी हाती राम वाल्या सीनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा हाथीराम आपले सहकारी अंसारी याला स्वर्ग, धरती आणि पाताच्या संदर्भात बोलत असतात. त्यावेळी हाथीराम म्हणतात की, मी हे व्हॉट्सएपवर वाचले आहे. हाथीराम यांचा हा डॉयलॉगवर बनलेला मीम सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हाच मीम मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांना जेव्हा विचारल जाते, ही माहिती कुठे मिळाली तेव्हा ते लोक अशा प्रकारचे उत्तर देतात, असेही मुंबई पोलीस म्हणाले आहे. हे देखील वाचा- मुंबईतील वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य नाही- महापालिका आयुक्त इक्बाल चहल
मुंबई पोलिसांचे ट्वीट-
When fake news peddlers are asked - where did you get this ‘exclusive’ news from?#NewsFromPaatalLok #ExposeFakeNews pic.twitter.com/SvHSgp4oJR
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 17, 2020
अनुष्का शर्माची वेबसीरीज पाताल लोक रिलीज झाली आणि पुन्हा अनुष्का शर्मा चर्चेत आली आहे. अनुष्काने ही वेबसीरीज प्रोड्यूस केली आहे. तिच्यासोबत या वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकारही चर्चेत आले आहेत.