मुंबईतील वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य नाही- महापालिका आयुक्त इक्बाल चहल
BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांश राज्य ही कोरोनाच्या विखळख्यात अडकली असून तेथे बळींचा आकडा ही दिवसागणिक वाढत आहे. यासाठी राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी वेळोवेळी योग्य ती पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालये कोविड19 च्या रुग्णांनी भरली आहेत. परंतु महापालिकेकडून आणि सरकारकडून विविध ठिकाणी कोविड आणि आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यानंतर आता वानखेडे स्टेडिअम सुद्धा तात्पुरते कोरोनाबाधित रुग्णांसाठी द्यावे असे बोलले जात होते. मात्र यावर आता महापालिका आयुक्त एक्बाल चहल (BMC commissioner Iqbal Chahal) यांनी वानखेडे स्टेडिअम कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी महापालिकेने एमसीएला वानखेडे स्टेडिअमचा ताबा कोरोनाग्रस्तांसाठी द्यावा अशी मागणी केली होती. यावर मरिन ड्राइव्ह सिटीझन असोसिएशन यांनी यासाठी विरोध दर्शवला. तसेच या संदर्भातील पत्र सुद्धा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले होते. तर महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी असे म्हटले आहे की, वानखेडे स्टेडियम हा एक चांगला पर्याय नाही कारण ते खुले मैदान आहे आणि एक चांगला पर्याय नाही. तसेच थोड्याच दिवसात पावसाळा सुद्धा सुरु होणार आहे.(वानखेडे स्टेडियम मध्ये COVID-19 रुग्णांना ठेवण्यास मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशनचा विरोध)

मुंबई महापालिका शाळा सुद्धा क्वारंटाइन सेंटर म्हणून उपयोगात आणणार आहे. तसेच खासगी दवाखाने नॉन कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात यावेत असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1135 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.