Amazon वरुन ऑर्डर केले माऊथवॉश पण डिलिव्हर झाला Redmi Note 10; मग ग्राहकाने केले 'हे' काम
Redmi Note 10 delivered instead of mouthwash (Photo Credits: Twitter)

ऑनलाईन शॉपिंगच्या (Online Shopping) अनेक किस्से तुम्ही ऐकले, पाहिले असतील. महागडी वस्तू ऑर्डर केल्यानंतर साबण, दगड अशा गोष्टी डिलिव्हर झाल्याचे यापूर्वी आपण ऐकले आहे. परंतु, आता एक वेगळीच घटना समोर येत आहे. मुंबई (Mumbai) मधील एक व्यक्तीने अॅमेझॉन (Amazon) वरुन माऊथवॉश (Mouthwash) ऑर्डर केला होता. ज्याची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी होती. परंतु, जेव्हा त्याची घरी प्रॉडक्ट डिलिव्हर झाले तेव्हा बॉक्समधून चक्क रेडमी नोट 10 (Redmi Note 10) मोबाईल निघाला. यामुळे आश्चर्यचकीत झालेल्या त्या व्यक्तीने याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. तसंच ट्विटमध्ये कंपनीला देखील टॅग केले आहे.

ट्विटर युजर लोकेश डागा ने आपल्या पोस्टमध्ये अॅमेझॉन इंडिया ला टॅग करत ऑर्डर स्क्रीनशॉट सोबत रेडमी नोट 10 फोटो शेअर केला आहे. लोकेश यांनी ट्विटमध्ये लिहिले, हॅलो @amazonIN. मी ऑर्डर # 406-9391383-4717957 के माध्यम से को च्या माध्यमातून कोलगेटचा माऊथवॉश ऑर्डर केला होता. मात्र त्याऐवजी मला @RedmiIndia नोट 10 मिळाला. माऊथवॉश कंज्युमेबल प्रॉडक्ट असल्याने रिटर्न करता येत नाही. त्यामुळे अॅपच्या माध्यमातून रिटर्न रिक्वेस्ट टाकण्यास मी असमर्थ आहे.

Lokesh Daga Tweet:

त्याचबरोबर त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, पॅकेजिंगवर लेबल माझे होते. मात्र इनव्हॉईस कुणा दुसऱ्याचेच होते. हे प्रॉडक्ट योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी मी तुम्हाला मेल केला आहे.

लोकेश डागा यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. यावर अनेक गंमतीशीर प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान, लोकेश डागा यांनी 10 मे रोजी कोलगेट माऊथवॉशच्या 4 बाटल्या ऑर्डर केल्या होत्या. त्याची किंमत 396 रुपये होती. त्याऐवजी त्यांना मिळालेल्या रेडमी नोट 10 ची किंमत 13000 रुपये आहे. त्यामुळे मोबाईल योग्य व्यक्तीच्या हाती लागण्यासाठी डागा यांचा प्रामाणिकप प्रयत्न नक्कीच वाखाण्याजोगा आहे.